जगातील सगळ्यात जुना देश कोणता? रिपोर्टमधील नावावर बसणार नाही विश्वास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 14:14 IST2025-02-04T14:13:45+5:302025-02-04T14:14:15+5:30

इतिहासाचा विषय निघाला की, नेहमीच एका विषयावरून वाद होतो. तो म्हणजे सगळ्यात जुना देश कोणता? 

Iran is the world oldest country according or world population review | जगातील सगळ्यात जुना देश कोणता? रिपोर्टमधील नावावर बसणार नाही विश्वास!

जगातील सगळ्यात जुना देश कोणता? रिपोर्टमधील नावावर बसणार नाही विश्वास!

जगाचा इतिहास इतका जुना आहे की, त्याच्या खूणा नोंदवून ठेवणं खूप अवघड आहे. बदलत्या काळासोबत कितीतरी राजे आणि शासकांनी राज्य केलं आणि येणाऱ्या काळासोबत ते गायब झालेत. अशात इतिहासाचा विषय निघाला की, नेहमीच एका विषयावरून वाद होतो. तो म्हणजे सगळ्यात जुना देश कोणता? 

अलिकडेच World Population Review नं जगातील सगळ्यात जुन्या देशांची एक यादी जाहीर केली. यात ज्या देशाचं नाव सगळ्यात वर आहे, ते वाचून लोक हैराण झाले आहेत. चला तर जाणून घेऊ पृथ्वीवरील सगळ्यात जुना देश कोणता.

World Population Review नुसार, ईराण जगातील सगळ्यात जुना देश आहे. काळानुसार छोटे छोटे गाव मिळून एक राज्य बनलं. हा देश नाईल नदीच्या किनारी वसलेलं होतं, जो इसवी सन पूर्व ३१५० मध्ये वसवण्यात आला होता. 

त्यानंतर क्रमांक येतो व्हिएतनाम देशाचा. व्हिएतनामचा इतिहास आजपासून साधारण २७०० वर्ष जुना मानला जातो. इसवी सन पूर्ण १११ मध्ये चीनच्या हान राजवंशानं व्हिएतनामच्या उत्तर भागावर कब्जा मिळवला होता. १९४५ मध्ये येथील राष्ट्राध्यक्ष हो ची मिन्ह यांनी व्हिएतनाम स्वतंत्र असल्याचं घोषित केलं होतं.

या यादीत तिसऱ्या क्रमांकावर सूडान देशाचं नाव आहे. या देशाचा इतिहासही नाईल नदी इतकाच जुना मानला जातो. या देशावर इजिप्त आणि ब्रिटीश सरकारचं शासन होतं. सूडान शब्द अरबी भाषेतील शब्द 'बिलाद अल-सूदन' वरून घेण्यात आला. ज्याचा अर्थ काळ्या लोकांची भूमि असा होतो.

WPR च्या रिपोर्टनुसार, भारताच्या इतिहासाची सुरूवात आजपासून जवळपास इसवी सन पूर्व २००० मध्ये झाली होती. या रिपोर्टनुसार, या देशांचा इतिहास, संस्कृती सगळ्यात जुनी आहे. त्याशिवाय भारताला अनेक आविष्कारांचा देशही म्हटलं जातं. भारतात असे अनेक शोध लावण्यात आलेत, ज्यांचा स्वीकार आजही जगातील अनेक लोक करत नाहीत.

Web Title: Iran is the world oldest country according or world population review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.