शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
2
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उदभवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
3
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
4
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
5
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
6
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
7
पुतीन परतले, पुढे...?
8
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
9
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
10
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
11
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
12
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
13
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
14
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
15
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
16
बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक; ‘भीम ज्योत’चे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
17
भारतात अनेकदा आले, पण पुतिन पाकमध्ये एकदाही का गेले नाहीत?; जाणकारांनी केला मोठा खुलासा
18
मंदिराने ठेवलेली एफडी बँकांना हडपायची होती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ती देवाची संपत्ती...
19
नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल
20
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

आमच्या कोंबड्याच्या लग्नाला यायचं हं; अनोख्या आमंत्रणाची गावभर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2018 10:06 IST

कोंबड्याची लग्नासाठी आमंत्रण पत्रिका, मंडप, मेजवानी आणि बरंच काही

रायपूर: बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूरचं लग्न, उद्योगपती मुकेश अंबानींची लेक ईशाचा साखरपुडा यांची सध्या सर्वत्र चर्चा आहे. मात्र छत्तीसगडमधल्या दंतेवाडात चर्चा आहे ती कालियाच्या लग्नाची. विशेष म्हणजे हा कालिया कोणी माणूस नाहीय, तर कोंबडा आहे. कालियाचं सुंदरी नावाच्या कोंबडीशी लग्न झालंय. अगदी थाटामाटात हा विवाह सोहळा संपन्न झालाय. छत्तीसगडमधील दंतेवाडातल्या हिरानारमध्ये कालिया आणि सुंदरीचा लग्न सोहळा पार पडलाय. कडकनाथ प्रजातीच्या कोंबड्याबद्दल जनजागृती व्हावी, यासाठी या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. काल हा सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यासाठी मंडप घालण्यात होता. याशिवाय आमंत्रण पत्रिकादेखील छापण्यात आल्या होत्या. लग्न सोहळ्यासाठी आलेल्या पाहुण्यांसाठी मेजवानीची व्यवस्थाही करण्यात आली होती. या अजब लग्नाच्या गजब सोहळ्याची मोठी चर्चा सर्वत्र सुरू होती. कडकनाथ प्रजातीच्या कोंबड्यासाठी जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग मिळावा म्हणून मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये मोठी चढाओढ सुरू होती. मात्र यामध्ये मध्य प्रदेशला यश मिळालं. याच पार्श्वभूमीवर छत्तीसगडमध्ये कडकनाथ प्रजातीच्या कोंबडीचा विवाह अगदी दणक्यात पार पडला. 'कडकनाथ प्रजातीच्या कोंबड्यांचं प्रमाण कमी झालं होतं. त्यामुळे ही प्रजाती दुर्मिळ होते की काय, अशी भीती आम्हाला वाटत होती. मात्र आता या प्रजातीच्या कोंबड्यांची संख्या वाढलीय. त्यामुळे हा क्षण साजरा करण्यासाठी आम्ही हा विवाह सोहळा आयोजित केला होता,' अशी माहिती कुक्कुटपालन उद्योगाचे दंतेवाडा विभागाचे अध्यक्ष लुद्रु नाग यांनी दिली. 

टॅग्स :marriageलग्नJara hatkeजरा हटके