९० टक्के लोकांना माहीत नसेल ब्लेडमध्ये असणाऱ्या डिझाईनचे रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 01:24 PM2019-11-01T13:24:16+5:302019-11-01T13:27:10+5:30

शेविंग करण्यापासून ते हेअर कटिंगपर्यंत ब्लेडचा वापर केला जातो. ब्लेडच्या मधल्या डिझाइनकडे अनेकदा तुम्ही विशेष लक्ष देऊन पाहिलं सुद्धा असेल.

Interesting information about shaving blade design | ९० टक्के लोकांना माहीत नसेल ब्लेडमध्ये असणाऱ्या डिझाईनचे रहस्य

९० टक्के लोकांना माहीत नसेल ब्लेडमध्ये असणाऱ्या डिझाईनचे रहस्य

googlenewsNext

शेविंग करण्यापासून ते हेअर कटिंगपर्यंत ब्लेडचा वापर केला जातो. ब्लेडच्या मधल्या डिझाइनकडे अनेकदा तुम्ही विशेष लक्ष देऊन पाहिलं सुद्धा असेल. पण प्रत्येक ब्लेडमध्ये एकसारखं डिझाइन का असतं? असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? वेगवेगळ्या कंपन्यांचे ब्लेड बाजारात उपलब्ध आहेत. पण ब्लेडमध्ये एकसारखंच डिझाइन का असतं? चला जाणून घेऊ या प्रश्नाचं उत्तर...

कुणी केली सुरूवात?

जिलेट कंपनीचा संस्थापक किंग कॅप जिलेटने १९०१ मध्ये आपला सहकारी विलियम निकर्सनसोबत मिळून ब्लेडचं डिझाइन तयार केलं. त्यावेळीही तसंच डिझाइन होतं जसं तुम्ही आता बघता. किंग कॅप जिलेटने डिझाइन तयार केल्यावर त्याचं पेटेंट करून घेतलं आणि १९०४ मध्ये याचं उप्तादन सुरू केलं.

ब्लेडमध्ये का आहे हे खास डिझाइन

१९०१ मध्ये जिलेट ही रेजर आणि ब्लेड तयार करणारी एकुलती एक कंपनी होती. त्यावेळी रेजरमध्ये ब्लेड बोल्टच्या मदतीने फिट करावं लागत होतं. त्यामुळे ब्लेडच्या मधोमध अशाप्रकारचं डिझाइन तयार केलं होतं. सर्वातआधी जिलेटने ब्लू जिलेट नावाने एक ब्लेड तयार केलं होतं. १९०४ मध्ये पहिल्यांदा केवळ १६५ ब्लेड तयार केले होते. 

नंतर ब्लेड तयार करणाऱ्या दुसऱ्या कंपनी सुद्धा आल्यात. पण त्यांनीही ब्लेडचं जुनंच डिझाइन कॉपी केलं. कारण कंपन्यांसमोर अडचण ही होती की, त्यावेळी रेजर जिलेट कंपनीचेच येत होते. त्यामुळे त्या रेजरमध्ये ब्लेड फिट बसावं म्हणून डिझाइन तसंच ठेवण्यात आलं.

कशी आली ब्लेडची आयडिया?

१८९० मध्ये जिलेट कंपनीचा संस्थापक किंग कॅप जिलेट बॉटलचं झाकण तयार करणाऱ्या कंपनीमध्ये सेल्समनचं काम करत होता. नोकरीदरम्यान त्याने पाहिले की, लोक झाकणांचा वापर केल्यावर ते फेकून देतात. तरीही इतक्या छोट्या वस्तूमुळे कंपनी चालवली जाते.

 
अशात त्याने अशी वस्तू तयार करण्याचा विचार केला जी स्वस्त असावी आणि वापरल्यावर फेकता यावी. त्यावेळी लोक वस्तऱ्याने शेविंग करत होते. पण वस्तऱ्याने शेविंग करणं फारच घातक असायचं. सोबतच त्याने वेळही जास्त लागत होता. किंग कॅपने वस्तऱ्याला पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्याने दोन्ही बाजूने धार असलेलं सेफ्टी रेजर तयार केलं. १९०१ च्या डिसेंबरमध्ये त्याने या डिझाइनचं पेटेंट करून घेतलं.
 

Web Title: Interesting information about shaving blade design

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.