आजही इथे लोक राहतात जमिनीखाली बनलेल्या घरात, 100 वर्ष जुन्या घरांमध्ये आहे सगळ्या सुविधा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 13:56 IST2023-08-10T13:49:52+5:302023-08-10T13:56:11+5:30
एक असं ठिकाण आहे जिथे लोक जमिनीखाली खोलवर घरं तयार करून राहतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचं कारणही धक्कादायक आहे.

आजही इथे लोक राहतात जमिनीखाली बनलेल्या घरात, 100 वर्ष जुन्या घरांमध्ये आहे सगळ्या सुविधा
'पाताळ लोक' हा शब्द तुम्ही वेगवेगळ्या कथांमध्ये किंवा घरातील वयोवृद्धांकडून ऐकला असेल. पण तुम्ही ते कधी पाहिलं नसेल. अशात जर आम्ही सांगितलं की, पृथ्वीवरही एक पाताळ लोक आहे तर कसं वाटेल? एक असं ठिकाण आहे जिथे लोक जमिनीखाली खोलवर घरं तयार करून राहतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचं कारणही धक्कादायक आहे.
आफ्रिकेच्या ट्यूनिशियातील दजेबेल दाहर परिसरात लोक आजही शेकडो वर्ष जुन्या घरांमध्ये राहत आहेत. महत्वाची बाब म्हणजे ही घरे जमिनीखाली तयार केलेली असतात. या अंडरग्रांउड गावाला तिज्मा या नावाने ओळखले जाते.
100 वर्ष जुन्या या घरांमध्ये लोक राहत तर आहेतच, सोबत त्यांनी जगण्यासाठी आवश्यक सर्व सुविधाही इथे तयार केल्या आहेत. इथे राहणारे जास्तीत जास्त लोकांची शेती आजूबाजूला आहे, त्यामुळे ते इथेच राहतात. त्यासोबतच अनेक लोक हा परिसर सोडून शहराकडे गेले आहेत.
जे लोक इथे जमिनीखालील घरात राहतात, त्यांचं म्हणनं आहे की, त्यांना त्यांच्य जमिनीवर आणि संस्कृतीवर प्रेम आहे. त्यामुळे ते ही घरे सोडून जात नाहीत. या घरांच्या आकर्षणाने इथे अनेक पर्यटकही येतात.
ही घरे जमिनीच्या खाली तयार करण्यामागे या परिसरात वाहणारी गरम हवा हे कारण आहे. येथील जास्तीत जास्त घरे ही मातीची तयार केलेली आहेत. त्यामुळे गरमीतही ही घरे थंड राहतात. तसेच हे तयार करताना असे केले जाते की, इथे हवा खेळती रहावी.