शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

इथे एका वर्षात १२ नाही तर १३ महिने असतात आणि आता तिथे सुरू आहे २०१३वं वर्ष! 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 11:21 AM

भारतासह जगभरात नविन वर्ष २०२० चं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. पण एक असाही देश आहे जो आपल्यापेक्षा ७ वर्ष ३ महिने मागे आहे.

(Image Credit : agoda.com)

भारतासह जगभरात नविन वर्ष २०२० चं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. पण एक असाही देश आहे जो आपल्यापेक्षा ७ वर्ष ३ महिने मागे आहे. या देशात अजूनही २०१३ हे वर्ष सुरू आहे. कुणालाही विचारलं की, एका वर्षात महिने किती असतात तर सगळेच जराही उशीर न करता १२ महिने असं उत्तर देतील. पण या देशात एका वर्षात १२ नाही तर १३ महिने असतात.

या देशाचं नाव आहे इथियोपिया. इथियोपियामध्ये इथियोपियन कॅलेंडरचा वापर केला जातो. इथियोपिया संघीय लोकशाही प्रजासत्ताक हा पूर्व आफ्रिकेच्या शिंगामधील एक देश आहे. इथियोपियाच्या उत्तरेला इरिट्रिया, पश्चिमेला सुदान, दक्षिणेला केनिया, पूर्वेला सोमालिया तर ईशान्येला जिबूती हे देश आहेत. अदिस अबाबा ही इथियोपियाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. इथियोपिया हा जगातील सर्वांत प्राचीन देशांपैकी एक आणि आफ्रिकेतील दुसरा सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. आफ्रिकेतील सर्वाधिक जागतिक वारसा स्थाने ह्याच देशात आहेत.

(Image Credit : forbesafrica.com)

इथियोपियात अजूनही इथियोपियन कॅलेंडरचा वापर केला जातो. येथील लोकांनी अजूनही जूलियन किंवा ग्रेगोरियन कॅलेंडरचा वापर सुरू केलेला नाही. त्यांच्या कॅलेंडरमध्ये एका वर्षात १३ महिने असतात. येथील नविन वर्ष १० किंवा ११ डिसेंबरपासून सुरू होतं. इथे १२ महिन्यातील प्रत्येक महिन्यात ३० दिवस असतात.

(Image Credit : tripadvisor.com)

शेवटचा महिना पाग्युमे नावाने ओळखला जातो. ज्यात केवळ पाच किंवा दिवस असतात. वर्षभरात जे दिवस मोजले जात नाहीत, ते दिवस मिळून एक महिना तयार केला जातो.

इथियोपियामध्ये सुमारे ९० भाषा वापरल्या जातात ज्यांपैकी बहुसंख्या भाषा आफ्रो-आशियन भाषासमूहामधील आहेत. अम्हारिक ही राजकीय भाषा असून इतर भाषांना प्रादेशिक स्तरावर अधिकृत दर्जा मिळाला आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सInternationalआंतरराष्ट्रीय