इथे एका वर्षात १२ नाही तर १३ महिने असतात आणि आता तिथे सुरू आहे २०१३वं वर्ष!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 11:30 IST2020-01-27T11:21:29+5:302020-01-27T11:30:22+5:30
भारतासह जगभरात नविन वर्ष २०२० चं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. पण एक असाही देश आहे जो आपल्यापेक्षा ७ वर्ष ३ महिने मागे आहे.

इथे एका वर्षात १२ नाही तर १३ महिने असतात आणि आता तिथे सुरू आहे २०१३वं वर्ष!
(Image Credit : agoda.com)
भारतासह जगभरात नविन वर्ष २०२० चं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. पण एक असाही देश आहे जो आपल्यापेक्षा ७ वर्ष ३ महिने मागे आहे. या देशात अजूनही २०१३ हे वर्ष सुरू आहे. कुणालाही विचारलं की, एका वर्षात महिने किती असतात तर सगळेच जराही उशीर न करता १२ महिने असं उत्तर देतील. पण या देशात एका वर्षात १२ नाही तर १३ महिने असतात.
या देशाचं नाव आहे इथियोपिया. इथियोपियामध्ये इथियोपियन कॅलेंडरचा वापर केला जातो. इथियोपिया संघीय लोकशाही प्रजासत्ताक हा पूर्व आफ्रिकेच्या शिंगामधील एक देश आहे. इथियोपियाच्या उत्तरेला इरिट्रिया, पश्चिमेला सुदान, दक्षिणेला केनिया, पूर्वेला सोमालिया तर ईशान्येला जिबूती हे देश आहेत. अदिस अबाबा ही इथियोपियाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. इथियोपिया हा जगातील सर्वांत प्राचीन देशांपैकी एक आणि आफ्रिकेतील दुसरा सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. आफ्रिकेतील सर्वाधिक जागतिक वारसा स्थाने ह्याच देशात आहेत.
(Image Credit : forbesafrica.com)
इथियोपियात अजूनही इथियोपियन कॅलेंडरचा वापर केला जातो. येथील लोकांनी अजूनही जूलियन किंवा ग्रेगोरियन कॅलेंडरचा वापर सुरू केलेला नाही. त्यांच्या कॅलेंडरमध्ये एका वर्षात १३ महिने असतात. येथील नविन वर्ष १० किंवा ११ डिसेंबरपासून सुरू होतं. इथे १२ महिन्यातील प्रत्येक महिन्यात ३० दिवस असतात.
(Image Credit : tripadvisor.com)
शेवटचा महिना पाग्युमे नावाने ओळखला जातो. ज्यात केवळ पाच किंवा दिवस असतात. वर्षभरात जे दिवस मोजले जात नाहीत, ते दिवस मिळून एक महिना तयार केला जातो.
इथियोपियामध्ये सुमारे ९० भाषा वापरल्या जातात ज्यांपैकी बहुसंख्या भाषा आफ्रो-आशियन भाषासमूहामधील आहेत. अम्हारिक ही राजकीय भाषा असून इतर भाषांना प्रादेशिक स्तरावर अधिकृत दर्जा मिळाला आहे.