हनिमूनचे तीनतेरा! पत्नीचा कारनामा पाहून पतीला बसला धक्का; दोघांनी घटस्फोट घेतला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2022 08:16 IST2022-12-04T08:16:29+5:302022-12-04T08:16:40+5:30

नवऱ्याऐवजी पत्नीची बहिणीसाेबत परदेशवारी, हनिमून पॅकेजसाठी या युवकाने सुमारे साडेचार लाख रुपये ट्रॅव्हल कंपनीला दिले होते

Instead of the husband, the wife goes abroad with her sister, Husband gave divorce | हनिमूनचे तीनतेरा! पत्नीचा कारनामा पाहून पतीला बसला धक्का; दोघांनी घटस्फोट घेतला

हनिमूनचे तीनतेरा! पत्नीचा कारनामा पाहून पतीला बसला धक्का; दोघांनी घटस्फोट घेतला

डेहराडून : डेहराडून येथील एका युवकाचे सहारनपूर येथील युवतीशी लग्न झाले. तिच्याबरोबर हनिमूनला जाण्याची स्वप्ने बघत असताना त्याला असा जोरदार धक्का आहे. त्याच्या पत्नीने ट्रॅव्हल कंपनीच्या संचालकाशी संधान बांधून परदेशवारी केली. पण नवऱ्याबरोबर नव्हे तर बहिणीबरोबर फिरून आली. 

हनिमून पॅकेजसाठी या युवकाने सुमारे साडेचार लाख रुपये ट्रॅव्हल कंपनीला दिले होते. अंकित गर्ग असे या युवकाचे नाव आहे. 
अंकितचे सोनाक्षी या युवतीशी ऑक्टोबर २०२१ मध्ये लग्न झाले होते. त्याने त्यावर्षी डिसेंबर महिन्यात हनिमूनला जाण्यासाठी पैसे दिले हाेते. मात्र, दाेघांमध्ये खटके उडू लागले. त्यानंतर सोनाक्षी आपल्या माहेरी निघून गेली. अंकितने ट्रॅव्हल कंपनीकडे भरलेले पैसे परत मागितले. मात्र, ते पैसे देण्यास कंपनीकडून टाळाटाळ होऊ लागली. अखेर इन्स्टाग्रामवरील फाेटाेंमुळे तिची लबाडी उघड झाली. त्यानंतर अंकित व सोनाक्षीने परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. 

; घटस्फाेटाने अखेर

Web Title: Instead of the husband, the wife goes abroad with her sister, Husband gave divorce