शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर ५० व्या वर्षी मुलाच्या शिक्षिकेसोबत गुपचूप करत होते दोनाचे चार; पहिली बायको घेऊन आली 'वरात'; अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2021 14:05 IST

डॉक्टर आणि शिक्षिकेला पोलिसांनी घेतलं ताब्यात; पोलिसांकडून चौकशी सुरू

इंदूर: प्रेमाला वयाचं बंधन नसतं असं म्हणतात. मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये राहणाऱ्या एका डॉक्टरसोबत असाच प्रकार घडला आहे. ५० वर्षांचे डॉक्टर स्वत:पेक्षा १५ वर्षांनी लहान असलेल्या शिक्षिकेच्या प्रेमात पडले. पुढे त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. शनिवारी एका हॉटेलमध्ये दोघांच्या लग्नाचे विधी सुरू होते. तितक्यात तिथे डॉक्टरांची पत्नी तिच्या ३ मुलांसह पोहोचली. लग्न मांडवात एचकच गोंधळ झाला. लग्न विधी अपूर्णच राहिले आणि 'वरात' थेट पोलीस ठाण्यात पोहोचली. पोलिसांनी वधू, वराला ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे.तीन दिवस पहिलीसोबत, तीन दिवस दुसरीसोबत; अन् रविवारी...; पोलिसांसमोरच दोघींनी केली दादल्याची वाटणी

इंदूरमध्ये वास्तव्यास असलेले जितेंद्र दागी होमियोपॅथिक डॉक्टर आहेत. ते घरीच क्लिनिक चालवतात. त्यांना एक मुलगी आणि दोन मुलं आहेत. दीड वर्षांपूर्वी मुलीचं लग्न झालं आहे. डॉक्टरांचा एक मुलगा बारावीत शिकतो. त्यालाच शिकवण्यासाठी एक शिक्षिका घरी यायची. ही महिला एका खासगी शाळेची मुख्याध्यापिका असल्याचंदेखील समजतं.

शनिवारी भंवरकुआ येथील एका हॉटेलमध्ये डॉक्टर आणि त्यांची प्रेयसी असलेली शिक्षिका यांचा विवाह होता. लग्नाची संपूर्ण तयारी झाली होती. याची माहिती पहिल्या पत्नीला मिळाली. त्यानंतर ती तिच्या मुलांसह नातेवाईकांना घेऊन मांडवात पोहोचली. लग्न मंडपात एकच गोंधळ झाला. डॉक्टर आणि त्यांच्या होणाऱ्या पत्नीला मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस हॉटेलमध्ये पोहोचले.बाबो! एकाच मंडपात दोन नवरींसोबत एका नवरदेवाने केलं लग्न, सारं गाव बघण्यासाठी जमलं

पहिल्या पत्नीनं डॉक्टर आणि शिक्षिकेविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं. घरात संपत्तीवरून वाद सुरू असल्याचं डॉक्टरांनी पोलिसांना सांगितलं. कुटुंबियांच्या परवानगीनं दुसरं लग्न करत असल्याचा दावा त्यांनी केला. पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसरं लग्न कसं करता, असा प्रश्न पोलिसांनी त्यांना विचारला. या प्रश्नाचं उत्तर त्यांना देता आलं नाही.