परस्त्रीसोबत संबंध न ठेवण्याचा ज्याने केला नियम तोच रंगेहाथ पकडला गेला अन्....

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2019 03:14 PM2019-11-02T15:14:56+5:302019-11-02T15:16:06+5:30

सामान्यपणे असं फार कमी बघायला मिळतं की, जी व्यक्ती एखादा कायदा करण्यात मदत करते, त्याच व्यक्तीला कायदा तोडल्यावर शिक्षा मिळाली असेल.

Indonesia man helped form adultery law whipped for affair with married woman | परस्त्रीसोबत संबंध न ठेवण्याचा ज्याने केला नियम तोच रंगेहाथ पकडला गेला अन्....

परस्त्रीसोबत संबंध न ठेवण्याचा ज्याने केला नियम तोच रंगेहाथ पकडला गेला अन्....

googlenewsNext

सामान्यपणे असं फार कमी बघायला मिळतं की, जी व्यक्ती एखादा कायदा करण्यात मदत करते, त्याच व्यक्तीला कायदा तोडल्यावर शिक्षा मिळाली असेल. पण इंडोनेशियातील सुमात्रामध्ये अशीच एक विचित्र घटना घडली आहे. इथे मुखलिस बिन मोहम्मद नावाच्या एका व्यक्तीने व्यभिचारासाठी कठोर नियम केले होते. पण तो त्याच गुन्ह्यात पकडला गेला आणि त्याला खुलेआम चाबकाचे २८ फटके मारण्यात आले. 

इंडोनेशियात एखाद्या विवाहित पुरूषाने दुसऱ्या विवाहित महिलेशी संबंध ठेवले तर याला व्यभिचार मानलं जातं. रिपोर्ट्सनुसार, एकेह उलेमा काउंन्सिलने इंडोनेशियामध्ये कठोर नियम तयार केले आणि मुखलीसही या काउन्सिलसोबत जुळलेला आहे. त्यानेच या कायदा करण्यात मदत केली होती. पण नंतर तोच त्याने केलेला नियम तोडताना आढळला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, समुद्र किनाऱ्याजवळ एका कारमध्ये पोलिसांनी मुखलीस आणि एका महिलेला पकडले. गुरूवारी त्यांना शिक्षा देण्यात आली. यात मुखलीसला चाबकाचे २८ फटके तर महिलेला छडीने  २३ फटके मारण्यात आले. असे सांगितले जाते की, मुखलीसला एकेह उलेमा काउन्सिलमधून काढण्यात आलं.

असेही सांगितले जात आहे की, ४६ वर्षीय मुखलीस धर्मगुरूही आहे. तो इंडोनेशियातील पहिला असा धर्मगुरू आहे, ज्याला २००५ मध्ये शरिया कायदा लागू झाल्यानंतर सार्वजनिक रूपाने कोडे मारण्याची शिक्षा सुनावण्यात आली. रिपोर्ट्सनुसार, एकेह प्रांतात जुगार खेळणे, समलैंगिक संबंध ठेवणे, लग्नाआधी संबंध ठेवणे आआणि दारू पिणे हा गुन्हा  आहे. यासाठी शिक्षाही दिली जाते. 

Web Title: Indonesia man helped form adultery law whipped for affair with married woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.