भारतीय 'चड्डी' जगभरात होणार फेमस, जाणून घ्या काय केला कारनामा...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 12:27 PM2019-03-25T12:27:49+5:302019-03-25T12:32:36+5:30

चड्डी हा भारतात दररोज वापरला जाणारा शब्द आहे. पण आता हा शब्द जगभरात लोकप्रिय होणार आहे.

Indian word chuddi enter oxford English dictionary | भारतीय 'चड्डी' जगभरात होणार फेमस, जाणून घ्या काय केला कारनामा...

भारतीय 'चड्डी' जगभरात होणार फेमस, जाणून घ्या काय केला कारनामा...

Next

(Image Credit : netchilly)

ऑक्सफोर्ड इंग्लिश डिक्शनरीमध्ये वेळोवेळी जगभरातील वेगवेगळ्या शब्दांचा समावेश केला जातो. यात आता भारतातील एका रोजच्या जीवनातील शब्दाचा समावेश करण्यात आला आहे. हा शब्द आहे 'चड्डी'. या शब्दासोबतच ६५० नव्या शब्दांचा अधिकृतपणे डिक्शनरीमध्ये समावेश करण्यात आला आहे. 

ब्रिटीश शासनाच्या वेगवेगळ्या कागदपत्रांमध्ये हा शब्द सापडला आहे. पण हा शब्द १९९० मध्ये बीबीसीवर येणाऱ्या भारतीय अभिनेत्री मीरा स्याल आणि संजीव भास्कर यांच्या ब्रिटीश-आशियाई कॉमेडी सीरिज 'गुडनेस ग्रेशिअस मी'मध्ये सापडला. यात संजीव भास्कर यांनी त्यांच्या डायलॉगमध्ये  ‘Kiss my a**e’ ऐवजी ‘Kiss My Chuddies’ असं म्हटलं होतं. 

हा शब्द डिक्शनरीमध्ये 'शॉर्ट टाऊजर, शॉर्ट्स या रूपाने देण्यात आला आहे. चड्डी हा शब्द भारतात अंडरविअरसाठी सर्रास वापरला जातो. 



 



 


ऑक्सफोर्ड इंग्लिश डिक्शनरीचे वरिष्ठ सहायक संपादक जे. डेंट यांनी सांगितले की, डिक्शनरीमध्ये कोणताही नवीन शब्द जोडण्याआधी त्यावर विचार केला जातो. त्यानंतर त्या शब्दाला डिक्शनरीमध्ये टाकलं जातं. 

याआधी २६ जानेवारी २०१८ ला 'नारी शक्ती' या शब्दाचा ऑक्सफोर्ड डिक्शनरीमध्ये समावेश करण्यात आला होता. त्यानंतर जानेवारी २०१९ मध्ये जयपूर साहित्य संमेलनमध्ये या शब्दाला Oxford Dictionaries 2018 Hindi Word of the Year निवडलं गेलं होतं. 

यासोबतच अनेक भारतीय शब्दांचा ऑक्सफोर्ड इंग्लिश डिक्शनरीमध्ये समावेश करण्यात आला आहे. यात अच्छा, अन्ना, गुलाबजामून, मिर्च मसाला, गोश्त, कीमा, जुगाड, दादागिरी, बापू, सूर्य, चमचा, अब्बा, नाटक, चुप, फंडा या शब्दांचा समावेश आहे. तसेच लूट, बंगला, अवतार, मंत्र, चटणी, खाट, डकैत, डूंगरी, बाजीगर, गुरू, पंडित, खाकी, जंगल, निर्वाण, पक्का, पजामा, महाराज असेही काही शब्द आहेत. 

Web Title: Indian word chuddi enter oxford English dictionary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.