Indian storekeeper wins Dubai raffle after buying tickets for 10 years | एका झटक्यात दुकानदार बनला लखपती!, 38 लाख रुपयांसह मिळाली शानदार कार...
एका झटक्यात दुकानदार बनला लखपती!, 38 लाख रुपयांसह मिळाली शानदार कार...

'ऊपर वाला जब भी देता, देता छप्पड़ फाड़ के' अशी म्हण दुबईतील एका भारतीय दुकानदाराला परफेक्ट लागू पडते. या दुकानदाराने एका लॉटरी तिकिटात दोन लाख दिरहम (54,452 डॉलर) जिंकले आहेत. हा दुकानदार गेल्या दहा वर्षांपासून रेफल (लॉटरी) तिकीट खरेदी करत होता. श्रीजित असे या दुकानदाराचे नाव आहे. 

खलीज टाइम्सच्या रिपोर्टनुसार, श्रीजित यांनी शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये (डीएसएफ) इन्फिनिटी मेगा रेफलमध्ये इन्फिनिटी क्यूएक्स 50 कारसोबत दोन लाख दिरहम (54,452 डॉलर) जिंकले आहेत. लॉटरी जिंकल्यानंतर श्रीजित यांनी सांगितले की, "माझा विश्वास बसला नाही. एक-ना-एक दिवस नक्की जिंकेन अशी आशा बाळगून गेल्या 10 वर्षात प्रत्येक वर्षी एक रेफल तिकीट खरेदी केले आहे. लॉटरी जिंकणे माझ्यासाठी खूप अर्थपूर्ण आहे. स्वप्ने सत्यात उतरतात, याची आता मला खात्री आहे."

याचबरोबर, "मला दोन मुले आहेत. माझी पत्नी गर्भवती आहे. मुलांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी लॉटरी जिंकलेल्या पैशांचा उपयोग होईल", असे श्रीजित यांनी सांगितले. दरम्यान, इन्फिनिटी मेगा रेफल दरवर्षी फेस्टिव्हलदरम्यान डीएसएफच्या व्हिजिटर्संना एक इन्फिनिटी क्यूएक्स50 कार आणि दोन दिरहम इतके बक्षीस देण्यात येते. याशिवाय, फेस्टिव्हलच्या शेवटी डीएसएफचा एक भाग्यशाली विजेता 10 लाख दिरहमचा पुरस्कार जिंकू शकतो. 

महत्त्वाच्या बातम्या 

धक्कादायक! नेपाळच्या रिसॉर्टमध्ये सापडले केरळच्या 8 पर्यटकांचे मृतदेह

'पुस्तक झालं आता व्हिडीओ आला'; छत्रपती संभाजीराजे संतापले

तुकडे तुकडे गँग अस्तित्वातच नाही, मोदी सरकारचा खुलासा

Delhi Election : ...म्हणून केजरीवालांना दाखल करता आला नाही उमेदवारी अर्ज

Video: मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; ट्वविटरवरील 'त्या' व्हिडीओमुळे संताप

आंध्र प्रदेशच्या आता तीन राजधान्या, देशातील पहिलाच प्रयोग

Web Title: Indian storekeeper wins Dubai raffle after buying tickets for 10 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.