शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

'या' एका व्यक्तीमुळे रेल्वेत बसवण्यात आले होते टॉयलेट, वाचा फारच इंटरेस्टिंग आहे यामागची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 13:22 IST

Indian Railway Facts : आपल्याला विश्वासही बसणार नाही की, एक वेळ अशीही होती जेव्हा भारतीय रेल्वेत टॉयलेट नसायचे. मात्र, एका व्यक्तीमुळे हे शक्य झालं.

Indian Railway Facts: रेल्वेने लांबचा प्रवास करायचा असेल आणि जर रेल्वेत टॉयलेटच नसेल तर विचार करा काय स्थिती होईल...किती वेळ कंट्रोल करणार? खरंतर याचा विचारही करवत नाही. पण आपल्याला विश्वासही बसणार नाही की, एक वेळ अशीही होती जेव्हा भारतीय रेल्वेत टॉयलेट नसायचे. तेव्हा लोकांसाठी रेल्वेने लांबचा प्रवास करणं आव्हानच होतं. आता तर प्रत्येक रेल्वेत, इतकंच नाही तर डब्या डब्यांमध्ये टॉयलेटची सोय असते. पण प्रश्न हा आहे की, हा बदल झाला कसा आणि कुणामुळे झाला? आज आपण रेल्वेत टॉयलेट सुरू होण्यामागची अनोखी कहाणी जाणून घेणार आहोत.

एका व्यक्तीमुळे झाला बदल

१८५३ मध्ये भारतीय रेल्वेला सुरूवात झाली. तेव्हा आतासारखे पॅसेंजर कोचमध्ये कोणतीही टॉयलेटची सुविधा नव्हती. अशात लांबचा प्रवास करणं खरंतर एक आव्हानच होतं आणि प्रवाशांना टॉयलेटला जाण्यासाठी रेल्वे पुढच्या स्टेशनला थांबण्याची वाट बघावी लागत होती. बरीच वर्ष हे असंच चालत राहिलं. 

पुढे १९०९ साली एक अशी घटना घडली, ज्यामुळे रेल्वेत टॉयलेटची सोय झाली. झालं असं होतं की, अखिल चंद्र सेन नावाची एक व्यक्ती रेल्वेने प्रवास करत होती. प्रवासादरम्यान काही कारणाने त्याचं पोट बिघडलं आणि फ्रेश होण्यासाठी त्याना एका स्टेशनला उतरावं लागलं. सेन रेल्वेत पुन्हा बसणार इतक्या रेल्वे सुरू झाली. एका हातात पाण्याचं भांडं आणि दुसऱ्या हाताने धोतर पकडून ही व्यक्ती रेल्वेच्या मागे धावू लागली. धावत असताना व्यक्ती पडली आणि रेल्वे सुटली. 

रेल्वे विभागाला पत्र आणि...

या घटनेनंतर अखिल चंद्र सेन यांनी साहिबगंज डिव्हिजनल रेल्वे ऑफिसला रागाच्या भरात तक्रार करणारं एक पत्र लिहिलं आणि टॉयलेटची सेवा नसण्याबाबत खंत व्यक्त केली. रेल्वेत टॉयलेट हवेत या त्यांच्या विनंतीकडे रेल्वे अधिकाऱ्यांचं लक्ष गेलं. त्यामुळे असं मानलं जातं की, सेन यांनी केलेल्या तक्रारीमुळेच भारतीय रेल्वेत टॉयलेटला सुरूवात झाली. आजही या व्यक्तीने रेल्वे विभागाला लिहिलेलं पत्र दिल्लीच्या नॅशनल रेल्वे म्युझिअममध्ये सांभाळून ठेवण्यात आलं आहे.

रेल्वेच्या इंजिनात टॉयलेट का नसतं?

काही रिपोर्ट्सनुसार, इंजिनामध्ये लोको पायलटला बसण्यासाठी केवळ एक सीट असते. रेल्वेच्या इंजिनात टॉयलेट नसतं कारण इंजिनात जागेची कमतरता असते. इंजिन केवळ टेक्निकल उपकरणे आणि कंट्रोल पॅनलने भरलेलं असतं. तसेच सुरक्षेच्या कारणांनी सुद्धा इंजिनात टॉयलेट असणं शक्य नाही. इंजिन फारच संवेदनशील असतं आणि टॉयलेटसारखी व्यवस्था सुरक्षेसाठी धोका ठरू शकते. त्यामुळे यात केवळ आवश्यक उपकरणेच असतात.

मग कसं मॅनेज करतात लोको पायलट?

आधी हे जाणून घ्या की, भारतीय रेल्वे आता काही रेल्वेंच्या इंजिनांमध्ये छोटे पोर्टेबल किंवा वॉटर-लेस टॉयलेट लावण्याचा विचार करत आहे. जेणेकरून लोको पायलटची सोय व्हावी. पण सध्या तर लोको पायलट टॉयलेटला जाण्यासाठी पुढील स्टेशन येण्याची वाट बघत असतात. किंवा मग पोर्टेबल सुविधांचा आधार घेतात. त्यांना पुढील स्टेशनवर टॉयलेटला जाण्याचा वेळ मिळतो. स्टेशनवर लोको पायलटसाठी विशेष टॉयलेटची व्यवस्था केलेली असते.

English
हिंदी सारांश
Web Title : The story of how toilets were added to Indian trains.

Web Summary : All thanks to one man's complaint about a bad experience. In 1909, a passenger named Akhil Chandra Sen wrote to railway authorities after missing his train due to needing a toilet. This led to the introduction of toilets in Indian trains.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सIndian Railwayभारतीय रेल्वेJara hatkeजरा हटके