'या' देशात भाड्याने मिळते पत्नी; लग्न करून एकत्रही राहू शकता, पण मोजावे लागतील 'इतके' पैसे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 14:16 IST2025-09-02T14:14:51+5:302025-09-02T14:16:11+5:30
या ट्रेंडमध्ये, पुरुष पैसे देऊन महिलेला पत्नीसारखी वागणूक देतो. ती महिला त्या पुरुषासाठी जेवण बनवते, त्याच्यासोबत बाहेर फिरायला जाते आणि एका कुटुंबासारखे वातावरण निर्माण करते.

'या' देशात भाड्याने मिळते पत्नी; लग्न करून एकत्रही राहू शकता, पण मोजावे लागतील 'इतके' पैसे!
Rental Wife Trend : या जगतात एक असा देश आहे, जिथे चक्क पत्नी भाड्याने घेता येते. या ठिकाणची नाईटलाईफ आणि सुंदर समुद्र किनारे जगभरात प्रसिद्ध आहेत. हा देश आहे 'थायलंड'. मात्र, सध्या एका वेगळ्याच कारणामुळे थायलंड चर्चेत आला आहे. या देशात एका विचित्र ट्रेंडने सध्या धुमाकूळ घातला आहे. या ट्रेंडबद्दल ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसू शकतो. या देशात सध्या पत्नी भाड्याने घेण्याचा विचित्र ट्रेंड जोर धरत आहे. ऐकायला जरा विचित्र वाटत असला, तरी थायलंडच्या वेगवेगळ्या शहरात सध्या हा ट्रेंड लोकप्रिय होत आहे.
काय आहे हा 'रेंटल वाईफ' ट्रेंड?
या ट्रेंडमध्ये, पुरुष पैसे देऊन महिलेला पत्नीसारखी वागणूक देतो. ती महिला त्या पुरुषासाठी जेवण बनवते, त्याच्यासोबत बाहेर फिरायला जाते आणि एका कुटुंबासारखे वातावरण निर्माण करते. हा संपूर्ण व्यवहार एका कराराच्या आधारे होतो, ज्याला कायदेशीर विवाह मानले जात नाही. जर दोघांना एकमेकांची सोबत आवडली, तर ते पुढे जाऊन लग्नही करू शकतात.
या ट्रेंडचा खुलासा कसा झाला?
या विचित्र ट्रेंडचा खुलासा एका पुस्तकातून झाला आहे. 'Thai Taboo The Rise of Wife Rental in Modern Society' नावाच्या या पुस्तकात लेखक लावर्ट ए. इमॅन्युअल यांनी याबद्दल माहिती दिली आहे. ते सांगतात की, अनेकदा गरीब कुटुंबातील महिला हे काम स्वीकारतात. यातील बहुतांश महिला नाइट क्लब आणि बारमध्ये काम करणाऱ्या असतात, जिथे त्यांची ओळख परदेशी पर्यटकांशी होते.
'रेंटल वाईफ'चा दर कसा ठरतो?
एका 'रेंटल वाईफ'ची किंमत ठरवताना तिचे वय, सौंदर्य, शिक्षण आणि संबंध किती काळासाठी ठेवायचे आहेत, या गोष्टी विचारात घेतल्या जातात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका 'रेंटल वाईफ'ची किंमत $१,६०० ते $१,१६,००० (म्हणजे १.४ लाख ते १ कोटींहून जास्त) असू शकते. थायलंडमध्ये हा एक मोठा व्यवसाय बनत आहे.
या विचित्र ट्रेंडमुळे अनेक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या असल्या तरी, यामुळे समाजावर आणि नैतिकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. थायलंड सरकारनेही या वाढत्या ट्रेंडबद्दल चिंता व्यक्त केली असून महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदे आणण्याची तयारी दर्शवली आहे. वेगवान जीवनशैली आणि एकाकीपणामुळे थायलंडमध्ये हा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे.