बापरे बाप! इतक्या महिलांसोबत होते इमरान खानचे संबंध, लिस्ट वाचून बसेल धक्का...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 13:34 IST2023-03-22T13:32:49+5:302023-03-22T13:34:36+5:30
Ex PM Imran khan Affair :90 दशकात इमरान खानच्या अनेक सुंदर गर्लफ्रेंड होत्या. त्यावेळी त्यांच्या अफेअरचे अनेक किस्से चर्चेत होते. ते त्यांच्या कॉलेजमध्ये फार फेमस होते.

बापरे बाप! इतक्या महिलांसोबत होते इमरान खानचे संबंध, लिस्ट वाचून बसेल धक्का...
Ex PM Imran khan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांचे त्यांच्या काळात अनेक सुंदर महिलांसोबत संबंध होते. त्यांच्या अफेअरचे किस्से नेहमीच चर्चेत असतात. इमरान खान यांचे पाकिस्तानातील अनेक महिलांसोबत संबंध होते. असं म्हणतात की, अनेक अभिनेत्री त्यांच्यावर फिदा होत्या. केवळ पाकिस्तानच नाही तर इतर देशातीलही अभिनेत्रीसोबत त्यांचे अफेअर होते.
90 दशकात इमरान खानच्या अनेक सुंदर गर्लफ्रेंड होत्या. त्यावेळी त्यांच्या अफेअरचे अनेक किस्से चर्चेत होते. ते त्यांच्या कॉलेजमध्ये फार फेमस होते. ते एखाद्या स्टारसारखे राहत होते. हेच कारण होतं की, कॉलेजमधील तरूणी त्यांच्यावर जीव ओवाळत होत्या. त्यावेळी सगळ्यांच्या ओठी केवळ इमरान खानचं नाव राहत होतं.
बॉलिवूड अभिनेत्री झीनत अमान, रेखा आणि पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनजीर भुट्टो यांच्याही ते फार जवळ होते. त्यांची लव्हस्टोरी फार फेमस होती. असं सांगितलं जातं की, इमरान खानची सगळ्यात पहिली प्रेयली एमा सर्जेंट होती. ती एका मोठ्या ब्रिटिश इन्वेस्टरची मुलगी होती. तिला अनेकदा इमरान खानसोबत बघण्यात आलं. एका पुस्तकात असाही दावा करण्यात आला होता की, ऑक्सफर्डमध्ये शिकत असताना इमरान खान आणि बेनजीर भुट्टो यांच्यातही संबंध होते. दोघांचं लग्नही होणार होतं.
क्रिकेट विश्वातून सन्यास घेतल्यानंतर इमरान खानने 43 वयात जेमिमा गोल्डस्मिथसोबत लग्न केलं होतं. ती एक ब्रिटिश सामाजिक कार्यकर्ता होती. पण हे नातं फार काळ टिकू शकलं नाही. 9 वर्षानी दोघांचा घटस्फोट झाला. 2004 मध्ये इमरान खानच्या आयुष्यात रेहम खान आली. 11 वर्षानी 2015 मध्ये दोघांनी लग्न केलं. हे नातंही फार काळ चाललं नाही. दोघांनी केवळ 9 महिन्यात घटस्फोट घेतला. रेहम खानचं सुद्धा हे दुसरं लग्न होतं.
इमरान खानने 2018 मध्ये पंतप्रधान होण्याआधी आध्यात्मिक गुरु बुशरा मानिकासोबत तिसरं लग्न केलं. बुशरा मानिका बुशरा बीबीच्या नावानेही ओळखली जाते. त्यासोबतच सूसी मेरे फिलिपसन, सीता वाइट, सारा क्रॉली, स्टेफनी बीचम, गोल्डी हॉन, सुजाना, मॅरी हेल्विन, लिजा कॅंपबेल, हन्ना मॅरी, लुलु ब्लॅकर या महिलांसोबतही इमरान खानचं नाव जोडलं गेलं.