शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या 25 वर्षांनंतर समोर आला पतीचा खरा चेहरा, पत्नीने केला धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 11:57 IST

Relationship : एका महिलेला तिच्या लग्नाच्या 25 वर्षानंतर हेच समजलं. तिला समजलं की, तिच्या पतीचं दुसऱ्या महिलेसोबत अफेअर सुरू आहे. इतकंच नाही तर दुसऱ्या महिलेपासून त्याला दोन मुलं आहेत.

Shocking Relationship News: अनेकदा लग्नाच्या बंधनात अडकल्यानंतर पती-पत्नी आपल्या जीवनात इतके व्यस्त होतात की, हे विसरून जातात की, त्यांनी त्यांच्या पार्टनरच्या इमानदारीची टेस्ट घ्यायला पाहिजे. कारण कोणत्याही लग्नात दोन्ही पार्टनरमध्ये प्रेम असणं फार महत्वाचं असतं. असं झालं नाही तर पती किंवा पत्नी एकमेकांना देत दुसऱ्या रिलेशनशिपचा मार्ग निवडतात. एका महिलेला तिच्या लग्नाच्या 25 वर्षानंतर हेच समजलं. तिला समजलं की, तिच्या पतीचं दुसऱ्या महिलेसोबत अफेअर सुरू आहे. इतकंच नाही तर दुसऱ्या महिलेपासून त्याला दोन मुलं आहेत.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Reddit वर एका पोस्टमध्ये महिलेने तिची ओळख लपवून हे सांगितलं की, तिच्या लग्नाला 25 वर्षे झाली आहेत. तिला वाटत होतं की, तिच्या पतीचं तिच्यावर खूप प्रेम आहे आणि ती आयुष्यभर त्याच्यासोबत आनंदाने राहू शकते. पण लग्नाच्या 25 वर्षानंतर महिलेला पतीच्या गुपिताबाबत समजलं आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली.

महिलेने सांगितलं की, 25 वर्षानंतर तिला समजलं की, तिच्या पतीची एक दुसरीही फॅमिली आहे. पती 17 वर्षांपासून दुसऱ्या महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये होता. इतकंच नाही तर तो दुसऱ्या महिलांच्या दोन मुलांचा पिताही आहे. पतीच्या दुसऱ्या नात्याबाबत समजल्यावर महिलेला चांगलाच धक्का बसला आहे. पीडित महिलेला तीन मुलं आहेत. यातील दोन जणं कॉलेजला जातात.

पीडित महिलेने सांगितलं की, तिच्या पतीची दुसरी पार्टनर एक इन्शुरन्स ब्रोकर आहे आणि ती कामानिमित्त वेगवेगळ्या शहरांमध्ये प्रवास करत असते. ती एक आठवडा काम करते आणि दुसरा आठवडा घरीच राहते. महिलेचा पती वीक ऑफला आपल्या दुसऱ्या पार्टनरला भेटायला जातो. तिच्यासोबत वेळ घालवतो. 

महिलेला पतीच्या दुसऱ्या रिलेशनशिपबाबत फेसबुकवरून समजलं. पतीने एक हिडन प्रोफाइल तयार केलं होतं. ज्यावर तो त्याच्या दुसऱ्या पार्टनरसोबतचे फोटो शेअर करत होता. महिलेने तिच्या पोस्टमध्ये शेवटी लिहिलं की, तिला हे माहीत नाही की, ती आता तिच्या पतीचा सामना कसा करेल?

टॅग्स :relationshipरिलेशनशिपSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके