विमानात पती-पत्नीमध्ये हाणामारी, विमानाचं करावं लागलं इमरजन्सी लॅंडिंग आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 12:01 IST2024-08-02T11:52:57+5:302024-08-02T12:01:03+5:30

एका कपलने तर कमालच केली. त्यांचं एका विमानात भांडण झालं, ज्यामुळे विमानाचं इमरजन्सी लॅंडिंग करावं लागलं.

Husband wife marital dispute forces emergency landing of Dublin flight | विमानात पती-पत्नीमध्ये हाणामारी, विमानाचं करावं लागलं इमरजन्सी लॅंडिंग आणि मग...

विमानात पती-पत्नीमध्ये हाणामारी, विमानाचं करावं लागलं इमरजन्सी लॅंडिंग आणि मग...

पती-पत्नीमध्ये भांडण होणं ही काही नवीन बाब नाही. वेगवगळ्या कारणांनी त्यांच्यात भांडण होतंच असतात. कधी कधी तर कपल्समध्ये बाजारात, मॉल्समध्ये, सिनेमागृहात तर कधी एखाद्या इव्हेंटमध्येही भांडण होतं. एका कपलने तर कमालच केली. त्यांचं एका विमानात भांडण झालं, ज्यामुळे विमानाचं इमरजन्सी लॅंडिंग करावं लागलं.

विमानात पती-पत्नीमध्ये भांडण झाल्याने विमानाचं इमरजन्सी लॅंडिग करावं लागलं. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, ही घटना नुकतीच डबलीनहून उड्डाण घेतलेल्या एका विमानात घडली. दोघांचं इतकं कडाक्याचं भांडण झालं की, चक्क विमान परत विमानतळावर लॅंड करावं लागलं. याचा चांगलाच फटका कपलला बसला. 

विमानाने सायंकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी डबलीनहून उड्डाण घेतलं होतं. उड्डाणानंतर साधारण एक तासाने क्रू ने इमरजन्सी लॅंडिंगची घोषणा केली. कारण कपलने विमानात जोरजोरात भांडण सुरू केलं होतं. कर्मचाऱ्यांनी दोघांना शांत करण्याचा खूप प्रयत्न केला. पण दोघेही ऐकायला तयार नव्हते. अशात पायलटने कंट्रोल रूमला याची माहिती दिली आणि विमानाची इमरजन्सी लॅंडिंग करावी लागली.

दोघांच्या या भांडणात महिलेच्या चेहऱ्यावर जखमही झाली. ज्यामुळे विमानतळावर तिच्या पतीला पोलिसांनी अटक केली. अखेर दोन तासांनंतर पुन्हा विमानाने उड्डाण घेतलं आणि ते पाल्मा डी मलोरका विमानतळावर पोहोचलं.
 

Web Title: Husband wife marital dispute forces emergency landing of Dublin flight