शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

'मॅडम, पत्नी आंघोळच करत नाही, घटस्फोट हवा' काउन्सेलरकडे मागणी, पारोस्या पत्नीमुळं पती झाला हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 14:04 IST

पतीची ही विनंती ऐकल्यावर काउन्सेलरही हैराण झाल्या. ही घटना अलीगढच्या चंडौस भागातील आहे. असं सांगितलं जात आहे की, दोन वर्षाआधी या दाम्पत्याचं लग्न झालं होतं.

उत्तर प्रदेशच्या अलीगढमध्ये एक पती आपल्या पत्नीला घटस्फोट देतोय कारण त्याची पत्नी आंघोळ करत नाही. वाचायला जरी हे विचित्र वाटत असलं तरी ही सत्य घटना आहे. शहरातील वुमन प्रोटेक्शन  सेलमध्ये हे प्रकरण पोहोचलं आहे. आता काउन्सेलिंग करून दोघांनाही समजावलं जात आहे. जेणेकरून आपसातील वाद दूर करून ते सोबत रहायला तयार व्हावे. पतीने काउन्सेलिंग दरम्यान पत्नीकडून घटस्फोट हवा असल्याची मागणी केली. त्यावेळी त्याने पत्नी आंघोळ करत नसल्याचं कारण सांगितलं.

पतीने काउन्सेलरला सांगितलं की, 'मॅडम माझी पत्नी आंघोळ करत नाही. त्यामुळे मी तिच्यासोबत राहू शकत नाही. कुपया मला घटस्फोट द्यावा'. पतीची ही विनंती ऐकल्यावर काउन्सेलरही हैराण झाल्या. ही घटना अलीगढच्या चंडौस भागातील आहे. असं सांगितलं जात आहे की, दोन वर्षाआधी या दाम्पत्याचं लग्न झालं होतं. मुलगा चंडौसचा राहणार आहे तर मुलगी क्वार्सीची राहणारी आहे. (हे पण वाचा : रेस्टॉरंटमध्ये स्तनपान केलं म्हणून महिलेला काढलं बाहेर, परिसरातील संतप्त महिलांनी शिकवला धडा)

पती-पत्नी एकमेकांच्या सवयीने हैराण

दोघांमध्ये लग्न झाल्यावर सुरूवातीला सगळं काही ठीक होतं. पण त्यानंतर दोघांमध्ये सतत वाद आणि भांडणं होऊ लागली होती. भांडणं इतके जास्त वाढले की, दोघेही एकमेकांच्या सवयीबाबत आणि राहणीमानाबाबत कमेंट करू लागले होते. यादरम्यान ९ महिन्याआधी दोघांना एक मुलगाही झाला. सर्वांना आशा होती की, मुलगा झाल्यावर दोघांमधील दूर होतील. पण तसं काहीही झालं नाही. वाद वाढले तेव्हा प्रकरण पोलीस आणि वुमन प्रोटेक्शन सेलकडे गेलं.

पत्नी म्हणाली माझ्यावर खोटे आरोप

यावेळी काउन्सेलर यांन पती आणि पत्नी दोघांनाही समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला. यादरम्यान पती, पत्नी आंघोळ करत नसल्याचं कारण देत घटस्फोटाची मागणी करू लागला होता. पती म्हणाला की, तो त्याच्या पत्नीमुळे या कारणाने हैराण आहे की, ती रोज आंघोळ करत नाही. तिच्या शरीराची दुर्गंधी येते. आता त्याच्या त्याच्या पत्नीसोबत रहायचं नाहीये. तर दुसरीकडे पत्नीने आरोप लावला की, तिच्यावर पती चुकीचे आरोप लावत आहे आणि तिला त्रास दिला जात आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशJara hatkeजरा हटकेDivorceघटस्फोट