बाबो! 3 बायकांना वैतागून नवऱ्याने सरकारी नोकरीचा राजीनामा दिला पण बॉसने लढवली शक्कल अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 16:02 IST2021-12-01T16:01:32+5:302021-12-01T16:02:27+5:30
3 बायकांना वैतागून एका नवऱ्याने थेट आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा दिल्याची घटना आता समोर आली आहे.

बाबो! 3 बायकांना वैतागून नवऱ्याने सरकारी नोकरीचा राजीनामा दिला पण बॉसने लढवली शक्कल अन्...
पती-पत्नीमध्ये नेहमीच विविध कारणांवरून छोटे मोठे वाद हे होत असतात. काही वेळा हे वाद टोकाला जातात. पण तुम्हाला जर कोणी पत्नींना कंटाळून सरकारी नोकरी सोडल्याचं सांगितलं. तर सुरुवातीला विश्वासच बसणार नाही. पण हो हे खरं आहे. 3 बायकांना वैतागून एका नवऱ्याने थेट आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा दिल्याची घटना आता समोर आली आहे. आपल्या पत्नींच्या असलेल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने नोकरी सोडण्याचा मोठा निर्णय घेतला होता. पण त्याच वेळी त्याच्या बॉसने त्याचा राजीनामा न स्वीकारता अनोखी शक्कल लढवली आहे.
बॉसने नवऱ्याला त्याच्या तिन्ही बायकांना खूश ठेवण्याची एक जबरदस्त कल्पना दिली आहे. गल्फ न्यूजच्या रिपोर्टनुसार, इराकमधील एका सैनिकाने तीन पत्नींसाठी आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा दिला. आपला राजीनामा त्याने आपल्या कमांडरकडे सुपूर्द केला. त्यावेळी राजीनामा देण्याचं सैनिकाचं कारण ऐकून कमांडर हैराण झाले. त्यांना धक्का बसला. आपण आपल्या तिन्ही बायकांच्या तक्रारींना वैतागून नोकरी सोडत असल्याचं सैनिकाने सांगितलं.
तीन बायकांच्या तक्रारीला खूप कंटाळला
सैनिक आपल्या तीन बायकांच्या तक्रारीला अक्षरश: खूप कंटाळला होता. आपला पती आपल्याला पुरेसा वेळ देत नाही. त्याला खूप कमी सुट्ट्या मिळतात. सुट्ट्यांमध्ये तो घरी आल्यावर झोपण्यात आणि इतर कामं पूर्ण करण्यातच वेळ घालवतो. आपल्या पतीसोबत त्या जास्त दिवस राहू शकत नाही, अशी तक्रार सैनिकांच्या पत्नींची होती.
सैनिकाला 12 दिवसांची दिली सुट्टी
एका सैनिकाचं राजीनामा देण्याचं हे कारण समजताच कमांडरलाही धक्का बसला. त्याने त्याचा राजीनामा स्वीकारला नाही. पण त्याने त्यावर वेगळा मार्ग शोधून दिला. त्याच्या तिन्ही पत्नींना खूश कऱण्यासाठी सैनिकाला सुट्ट्या दिल्या. त्याला तब्बल 12 दिवसांची सुट्टी देण्यात आली आणि प्रत्येक पत्नीसोबत चार दिवस राहून तिला खूश ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.