पत्नीला वाढदिवसाला पतीने दिलं असं गिफ्ट, दोघांचाही मोडला संसार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2023 11:15 IST2023-11-04T11:15:12+5:302023-11-04T11:15:35+5:30

एक पतीला पत्नीला वाढदिवसाला खास गिफ्ट द्यायचं होतं. ज्यामुळे एका मोठ्या रहस्याचा खुलासा झाला आणि दोघांच्या नात्यात दरी पडली.

Husband gift wife doorbell with secret camera on birthday found wife cheating | पत्नीला वाढदिवसाला पतीने दिलं असं गिफ्ट, दोघांचाही मोडला संसार...

पत्नीला वाढदिवसाला पतीने दिलं असं गिफ्ट, दोघांचाही मोडला संसार...

प्रत्येक पती आपल्या पत्नी वाढदिवस खास करण्याचा प्रयत्न करत असतो. सगळेच पत्नीसाठी काहीना काही गिफ्ट आणत असतात. पण जेव्हा गिफ्ट असं मिळालं की, ज्याने दोघांच्या नात्यात दरी निर्माण होईल. तेव्हा काय करावं? सोशल मीडियावर एक पती-पत्नीच्या नात्याबाबत बरीच चर्चा झाली. एक पतीला पत्नीला वाढदिवसाला खास गिफ्ट द्यायचं होतं. ज्यामुळे एका मोठ्या रहस्याचा खुलासा झाला आणि दोघांच्या नात्यात दरी पडली.

द सन वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, Illicitencounters नावाच्या एक डेटिंग वेबसाइटवर अलिकडेच एका व्यक्ती आपल्या मित्राच्या वैवाहिक जीवनाबाबत एक बाब सांगितली. जी फारच हैराण करणारी होती. एका गिफ्टने त्याचा मित्र आणि त्याची पत्नी यांच्यातील नातं खराब झालं. 

या व्यक्तीने सांगितलं की, त्याच्या मित्राच्या पत्नीचा वाढदिवस होता. वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून तो पत्नीसाठी एक कॅमेरा असलेली डोर बेल घेऊन आला. या डोर बेलची खासियत ही होती की, बाहेरच्या बाजूने यात बटनासोबत एक कॅमेराही लावलेला होता. या कॅमेराची लाइव्ह रेकॉर्डिंग फोनवर दिसत होती.

पत्नीच्या दग्याचा झाला खुलासा

एकदा पतीने बघितलं की, एक अनोळखी व्यक्ती त्याच्या घरी आली. पत्नी दरवाज्याच्या बाहेर येते आणि त्या व्यक्तीसोबत आक्षेपार्ह वागणूक करू लागते. हे सगळं काही पती बघतो आणि त्याला धक्का बसतो. त्याला विश्वास बसत नाही की, पत्नी त्याला दगा देत आहे. केवळ त्या गिफ्टमुळे दोघांच्या नात्यात मिठाचा खडा पडला. त्याने सांगितलं की, त्या डोर बेलने मित्राचा संसार मोडला.

सोशल मीडियावर लोकांनी ही घटना वाचल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. एक व्यक्ती म्हणाली की, या डोरबेलला बॅन केलं पाहिजे. तर दुसरी व्यक्ती म्हणाली की, त्याला कसं वाटलं असेल जेव्हा त्याला समजलं त्याची पत्नी त्याला दगा देत आहे. तिसरी व्यक्ती म्हणाली की, महिलेने चुकी केली  की, अशी डोरबेल असतानाही तिने प्रियकराला घरी बोलवलं.

Web Title: Husband gift wife doorbell with secret camera on birthday found wife cheating