याला म्हणतात नशीब! बायकोच्या पर्समध्ये होती 'अशी' गोष्ट; उघडताच नवरा झाला करोडपती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 11:27 IST2023-01-16T11:24:17+5:302023-01-16T11:27:22+5:30
एका व्यक्तीचं नशीब फळफळलं आहे. अवघे 160 रुपये खर्च करून तो करोडपती झाला. त्याने 8 कोटींहून अधिकची रक्कम जिंकली आहे.

याला म्हणतात नशीब! बायकोच्या पर्समध्ये होती 'अशी' गोष्ट; उघडताच नवरा झाला करोडपती
एका व्यक्तीचं नशीब फळफळलं आहे. अवघे 160 रुपये खर्च करून तो करोडपती झाला. त्याने 8 कोटींहून अधिकची रक्कम जिंकली आहे. मात्र करोडपती होण्यात त्याच्या पत्नीचा मोठा वाटा आहे. बायकोमुळे त्याचे आयुष्य बदलले असे त्या व्यक्तीचं म्हणणं आहे. तो आता रिटायरमेंटचा प्लॅन करत आहे, जेणेकरून त्याला पुढे आरामदायी जीवन जगता येईल. अमेरिकेतील कॅरोलिना येथे राहणारं हे कपल आहे.
द मिररच्या वृत्तानुसार, 65 वर्षीय टेरी पीस यांनी पॉवरबॉल लॉटरीचे तिकीट 160 रुपयांना विकत घेतले. पण घरी आल्यानंतर तो विसरला. तिकीट कुठेतरी हरवले. खूप वेळा शोधूनही टेरीला तिकीट मिळत नव्हतं. शेवटी त्याने पत्नीला तिकीट शोधण्याची विनंती केली. दरम्यान, पत्नीने पर्स तपासली असता तिला आश्चर्याचा धक्का बसला. तिकीट तिच्या पर्समध्ये ठेवलं होतं, ज्याबद्दल तिला माहितीही नव्हती.
पर्समध्ये तिकीट ठेवल्यानंतर टेरी विसरला होता. मात्र, तोपर्यंत पती-पत्नी दोघांनाही त्यांची लॉटरी लागणार असल्याची माहिती नव्हती. अशा परिस्थितीत या कपलने तिकीट काढल्यानंतर ते चेक केलं तेव्हा त्यांना धक्काच बसला. लॉटरी जिंकली होती, तीही तब्बल 8 कोटींची. बक्षीस जिंकल्यानंतर, टेरी म्हणाला - "हे आयुष्य बदलणारे आहे. ते भाग्यवान आहेत. सुदैवाने पत्नीला तिकीट सापडले."
"माझा माझ्या नशिबावर विश्वास होता. आपण किती आनंदी आहोत हे शब्द व्यक्त करू शकत नाहीत." गेल्या आठवड्यात कर कपात केल्यानंतर टेरीला 5 कोटी 78 रुपये मिळाले. आता या पैशातून आधी घराचे नूतनीकरण करण्याचा विचार करत आहे. जोडप्याला त्यांच्या नातवंडांसाठी काही पैसे वाचवायचे आहेत. टेरी ट्रक खरेदी करण्याचा विचार करत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"