मंगळ ग्रहावर रहायचं असेल खावे लागू शकतात सहा पायांचे कीटक - रिसर्च
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 16:04 IST2019-09-24T15:57:53+5:302019-09-24T16:04:29+5:30
वैज्ञानिक दिवसरात्र याच शोधात आहेत की, तिथे कोणत्या प्रकारचं जेवण उपलब्ध करून दिलं जावं. या जेवणाच्या शोधात फ्लोरिडा विश्वविद्यालयाच्या वैज्ञानिकांनी एक शोध केलाय.

मंगळ ग्रहावर रहायचं असेल खावे लागू शकतात सहा पायांचे कीटक - रिसर्च
(Image Credit : nypost.com)
विज्ञानाच्या मदतीने वेगवेगळ्या ग्रहांवर जीवन शोधण्याचं काम वेगाने सुरू आहे. अशातच मंगळ ग्रहावर राहण्याचं काम देखील वेगाने पुढे जात आहेत. तिथे श्वास घेण्यासाठी पुरेसं ऑक्सिजन आणि खाण्यासाठी जेवण मिळालं तर काम सोपं होईल. वैज्ञानिक दिवसरात्र याच शोधात आहेत की, तिथे कोणत्या प्रकारचं जेवण उपलब्ध करून दिलं जावं. या जेवणाच्या शोधात फ्लोरिडा विश्वविद्यालयाच्या वैज्ञानिकांनी एक शोध केलाय.
असा अंदाज लावला गेला की, मंगळ ग्रहावर सौर ऊर्जा, बर्फ आणि कार्बन डायऑक्साइड उपलब्ध आहे. जर तीन गोष्टी आहेत. तर पाणी आणि ऑक्सिजन सहजपणे तयार केलं जाऊ शकतं. भलेही पाणी आणि ऑक्सिजन तयार केलं गेलं तरी जेवणाचा स्त्रोत तयार करायला वेळ लागले. याच जेवणाच्या स्त्रोतावर शोध करत फ्लोरिडा विश्वविद्यालयाच्या वैज्ञानिकांनी सांगितले की, मंगळ ग्रहावर खाण्यासाठी कीटक हे चांगला स्त्रोस ठरू शकतात. पीठात तयार होणारे सहा पायांचे कीडे जेवण म्हणून वापरले जाऊ शकतात.
(Image Credit : dailymail.co.uk)
फ्लोरिडा विश्वविद्यालयाच्या वैज्ञानिकांनी स्पेसएक्सच्या एलन मस्क यांच्या डेटावरून एका योजना आखली आहे. ज्यात १० लाख लोकांची वस्ती मंगळ ग्रहावर वसवली जाऊ शकते. वैज्ञानिकांनी सांगितले की, कीड्यांऐवजी लॅबमध्ये तयार केलेलं मांस आणि डेअरी उत्पादनेही चांगला पर्याय ठरू शकतात.
(Image Credit : www.msn.com)
स्पेसएक्स सारखी मोठी आणि खाजगी कंपनी गेल्या काही वर्षांपासून मंगळ ग्रहावर मानवी वस्ती वसवण्याच्या प्रयत्नात आहे. ५० ते १०० वर्षांच्या आत या कंपन्यांना मंगळ ग्रहावर एक मोठी वस्ती विकसित करायची आहे.
सूर्य प्रकाशाची पुरेशी व्यवस्था नसल्या कारणाने भाज्यांचं उत्पादन करणं थोडं कठीण आहे. पण वैज्ञानिकांनी दावा केला आहे की, मीट आणि डेअरी उत्पदने लॅबमध्ये सहजपणे तयार केले जाऊ शकतात. त्यासोबतच जर लाल ग्रहावर एक कीट फार्म तयार केलं तर यातून खाण्याच्या गरजा भागवल्या जाऊ शकतात. कारण कीटक हे फार कमी पाण्यावर जगू शकतात आणि त्यात कॅलरी सुद्धा भरपूर प्रमाणात असतात.