रेल्वेतील लोअर बर्थ मिळवण्याच्या खास ट्रिक, पाहा तिकीट बुक करताना काय करावं लागेल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 13:53 IST2025-11-15T13:46:40+5:302025-11-15T13:53:55+5:30
Railway Lower Berth Seat Booking: बर्याच वेळा गाडीत सीट रिकाम्या असतात, तरीही लोअर बर्थ मिळत नाही. पण यामागे काही रेल्वेचे ठरलेले नियम असतात, हे अनेकांना माहीत नसतात.

रेल्वेतील लोअर बर्थ मिळवण्याच्या खास ट्रिक, पाहा तिकीट बुक करताना काय करावं लागेल...
Railway Lower Berth Seat Booking: रेल्वे नेहमीच प्रवास करणाऱ्या लोकांना याची चांगलीच जाणीव आहे की, लोअर बर्थ मिळणं किती अवघड असतं. बर्याच वेळा गाडीत सीट रिकाम्या असतात, तरीही लोअर बर्थ मिळत नाही. पण यामागे काही रेल्वेचे ठरलेले नियम असतात, हे अनेकांना माहीत नसतात. हे नियम समजून घेतले आणि बुकिंग करताना योग्य पद्धत वापरली, तर लोअर सीट मिळण्याची शक्यता वाढते.
लोअर बर्थ मिळण्यासाठी कोणते नियम लक्षात ठेवावेत?
कपल बुकिंग
लोअर बर्थ प्राधान्याने सीनियर सिटीझन आणि महिलांना दिली जाते. पण जर 3 किंवा त्याहून जास्त लोकांचा ग्रुप असेल तर लोअर बर्थ देणे कठीण होते. त्यामुळे 2 लोकांची म्हणजेच कपल बुकिंग केली तर लोअर बर्थ मिळण्याची शक्यता जास्त असते.
‘Lower Berth Only’ हा ऑप्शन
ऑनलाइन तिकीट बुक करताना “Lower Berth Only” हा पर्याय सिलेक्ट करा. लोअर बर्थ उपलब्ध असेल तरच तिकीट बुक होईल, नसेल तर सिस्टीम तिकीट कन्फर्म करणार नाही.
प्रवाशांची माहिती अचूक भरा
वय आणि लिंग योग्य भरले तर सिस्टम पात्र प्रवाशांना लोअर बर्थ देते. सीनियर सिटीझन, 45+ महिला किंवा गर्भवती महिला असल्यास योग्य माहिती टाकणे महत्त्वाचे. जर लोअर बर्थ मिळाली नाही तर? उपाय आहेत!
TTE कडून सीट बदलून घेण्याची विनंती
जर तुम्ही पात्र प्रवासी असाल (उदा. सीनियर सिटीझन, 45 वर्षांपेक्षा जास्त वयाची महिला, गर्भवती महिला) आणि तुम्हाला वरची किंवा मधली बर्थ मिळाली असेल, तर TTE ला रिकामी लोअर बर्थ देण्याची विनंती करा. TTE कडे रिकामी बर्थ बदलण्याचा अधिकार असतो.
प्रवासादरम्यान रिकामी झालेली लोअर बर्थ
काही लोअर बर्थ प्रवासात रिकामी होतात. अशा वेळी TTE त्या बर्थ पात्र प्रवाशांना देऊ शकतो. अनेकदा हाच सर्वात प्रभावी उपाय असतो.