रोज किती लीटर पेट्रोल जाळतात भारतीय लोक? डिझेलची आकडेवारी बघाल तर बसेल धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 12:02 IST2026-03-20T12:01:33+5:302026-03-20T12:02:25+5:30
Petrol - Diesel Use In India : सरकारची एजन्सी PPAC आणि उद्योगासंबंधी आकडेवारीनुसार, भारतात रोज कोट्यावधी लीटर पेट्रोल आणि डिझेलचा वापर केला जातो.

रोज किती लीटर पेट्रोल जाळतात भारतीय लोक? डिझेलची आकडेवारी बघाल तर बसेल धक्का
Petrol - Diesel Use In India : इराण विरोधात सुरू असलेल्या युद्धामुळे तेलाची जगभरात चर्चा सुरू आहे. आशियातील काही देशांना तेलाचा आणि गॅसचा तुटवडा जाणवत आहे. भारतातही याचा काही प्रमाणात प्रभाव बघायला मिळतोय. आपल्याला कदाचित माहीत नसेल, पण भारत हा जगातील तिसरा सगळ्यात मोठा तेल वापरकर्ता देश आहे. पण देशात रोज किती लीटर पेट्रोल आणि डिझेलचा वापर केला जातो? या प्रश्नाचं उत्तर नक्कीच आपल्याला अचंबित करणारं असेल. सरकारची एजन्सी PPAC आणि उद्योगासंबंधी आकडेवारीनुसार, भारतात रोज कोट्यावधी लीटर पेट्रोल आणि डिझेलचा वापर केला जातो.
रोज किती पेट्रोल जळतं?
भारतात वर्षाला साधारण ४७५० कोटी लीटर पेट्रोल खर्च केलं जातं. याचा अर्थ देशात दररोज साधारण १३ कोटी लीटर पेट्रोल वापरलं जातं. पेट्रोल मुख्यपणे टू-व्हीलर, कार आणि छोट्या वाहनांसाठी वापरलं जातं.
डिझेल किती जाळलं जातं?
आपल्याला कल्पना नसेल की, देशात पेट्रोलपेक्षा डिझेल वापरलं जातं. भारतात वर्षाला साधारण १०,७०० कोटी लीटर डिझेल जाळलं जातं. म्हणजे यानुसार बघायला गेलं तर दररोज साधारण २९ ते ३० कोटी लीटर डिझेल वापरलं जातं. हा आकडा पेट्रोलच्या तुलनेत दुप्पटपेक्षाही जास्त आहे.
भारतात वापरल्या जाणाऱ्या एकूण पेट्रोलिअम उत्पादनांमध्ये साधारण ४० टक्के भाग डिझेलचा आहे. त्यानंतर पेट्रोलचा भाग साधारण १६ टक्क्यांच्या आसपास आहे. वाहनांच्या उपयोगाच्या आधारावर भारतात रोज साधारण ९५ कोटी लीटर पेट्रोल - डिझेल आणि इतर वाहनांचं इंधन जाळलं जातं.
दरवर्षी वाढतेय मागणी
गेल्या काही वर्षांमध्ये भारतात पेट्रोलची मागणी खूप जास्त वाढली आहे. २०२२ - २३ मध्ये पेट्रोलचा वापर ३४.९८ मिलियन टनांपर्यंत पोहोचला आहे. जो एका वर्षात १३ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ दाखवतो.
भारतात सरासरी एक व्यक्ती दर महिन्याला साधारण ९ लीटर पेट्रोल - डिझेलचा वापर करतो. यात जवळपास २.८ लीटर पेट्रोल आणि ६.३ लीटर डिझेलचा समावेश आहे. म्हणजे प्रति व्यक्ती वर्षाला साधारण १०९ लीटर इंधन खर्च करतो.