मानवी शरीरातील नसांची लांबी इतकी की पृथ्वीच्या दोन फेऱ्या होतील, कशी ते जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 10:52 IST2026-04-11T10:51:22+5:302026-04-11T10:52:46+5:30

Human Body Facts : निसर्गाने मानवी शरीराची रचना अतिशय अद्भुत पद्धतीने केली आहे. पण आपल्याच शरीराबाबत अवयवांबाबत आपल्याला पुरेशी माहिती नसते.

How many blood vessels in human body you should know facts | मानवी शरीरातील नसांची लांबी इतकी की पृथ्वीच्या दोन फेऱ्या होतील, कशी ते जाणून घ्या

मानवी शरीरातील नसांची लांबी इतकी की पृथ्वीच्या दोन फेऱ्या होतील, कशी ते जाणून घ्या

Human Body Facts : मानवी शरीरातील बाहेरील अवयव जितके सोपे दिसतात, तितकीच आतली रचना अत्यंत गुंतागुंतीची असते. संपूर्ण शरीरात नसांचे जाळे पसरलेले असते, जे शरीर सुरळीत चालण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावते. निसर्गाने मानवी शरीराची रचना अतिशय अद्भुत पद्धतीने केली आहे. पण आपल्याच शरीराबाबत अवयवांबाबत आपल्याला पुरेशी माहिती नसते.

शरीरात किती नसा असतात?

तंत्रिका तंत्र आपल्याला जाणवणे, विचार करणे, हालचाल करणे आणि आसपासच्या गोष्टींवर प्रतिक्रिया देणे शक्य करून देते. मानवी शरीरात नसांचे जाळे खूप मोठे असते. अंदाजानुसार शरीरात सुमारे 7 ट्रिलियन नसांचे जाळे असते, म्हणजे साधारण ७ लाख कोटी. ही संख्या इतकी मोठी आहे की तिची कल्पना करणे कठीण आहे. तसेच, जर शरीरातील सर्व रक्तवाहिन्या सरळ करून जोडल्या, तर त्यांची एकूण लांबी जवळपास 1 लाख किलोमीटर इतकी होते, जी पृथ्वीभोवती दोन वेळा फिरण्याइतकी आहे.

नसांचे काम काय असते?

ऑक्सिजन आणि पोषक तत्त्वे पोहोचवणे

नसांचे जाळे शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत रक्त, ऑक्सिजन आणि आवश्यक पोषक तत्त्वे पोहोचवते.

अपशिष्ट बाहेर टाकणे

शरीरात तयार होणारे अपायकारक पदार्थ बाहेर काढण्याचे काम करते.

मेंदूचे संदेश पोहोचवणे

तंत्रिका तंत्र मेंदू, मेरुदंड आणि शरीरातील अवयवांमध्ये संदेश पोहोचवते.

तीन प्रकारच्या रक्तवाहिन्या

धमन्या (Arteries)
शिरा (Veins)
केशवाहिन्या (Capillaries)

Web Title : मानव शरीर की नसें: पृथ्वी के दो चक्कर लगाने जितनी लंबी!

Web Summary : मानव शरीर में लगभग 7 ट्रिलियन नसों का एक विशाल नेटवर्क है। यदि खींचा जाए, तो रक्त वाहिकाएँ 100,000 किमी तक फैल जाएंगी, जो पृथ्वी के दो चक्कर लगाएंगी। नसें ऑक्सीजन, पोषक तत्व पहुंचाती हैं, अपशिष्ट हटाती हैं, और धमनियों, शिराओं और केशिकाओं के माध्यम से मस्तिष्क और शरीर के बीच संदेश पहुंचाती हैं।

Web Title : Human Body's Nerves: Long Enough to Circle Earth Twice!

Web Summary : The human body contains a vast network of nerves, approximately 7 trillion. If stretched, blood vessels would span 100,000 km, circling Earth twice. Nerves deliver oxygen, nutrients, remove waste, and transmit messages between the brain and body via arteries, veins, and capillaries.