रेल्वेचा पीएनआर नंबर कसा तयार होतो आणि यातील आकड्यांमध्ये काय दडलेलं असतं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 12:07 IST2025-01-08T11:54:15+5:302025-01-08T12:07:39+5:30
PNR Number : तिकीट बुक केल्यावर तुम्हाला एक १० अंकी पीएनआर नंबर मिळतो. पीएनआर नंबर मिळतो हे सगळ्यांनाच माहीत असतं. पण त्यातील गुपित माहीत नसतं.

रेल्वेचा पीएनआर नंबर कसा तयार होतो आणि यातील आकड्यांमध्ये काय दडलेलं असतं?
PNR Number : भारतात लाखो लोक रोज रेल्वेनं प्रवास करतात. रेल्वेचा प्रवास वेळ वाचवणारा, कमी खर्चीक आणि आरामदायक असतो. तुम्हीही अनेकदा रेल्वेनं प्रवास केला असेल. तिकीट बुक केल्यावर तुम्हाला एक १० अंकी पीएनआर नंबर मिळतो. पीएनआर नंबर मिळतो हे सगळ्यांनाच माहीत असतं. पण त्यातील गुपित माहीत नसतं. हा एक यूनिक नंबर असतो. ज्याचा अर्थ होतो पॅसेंजर नेम रेकॉर्ड. या नंबरमध्ये तुमच्या प्रवासासंबंधी सगळी माहीत दडलेली असते. पीएनआर नंबरच्या माध्यमातून प्रवाशाचं नाव, रेल्वे नंबर, सीट नंबर, प्रवासाची तारीख इत्याही माहिती मिळवता येते.
कसा तयार होतो पीएनआर नंबर?
पीएनआर नंबर कसा तयार होतो? असा प्रश्न तुम्हालाही अनेकदा पडला असेल. हा यूनिक नंबर कसा तयार होतो, हे अनेकांना माहीत नसतं. तेच आज आपण जाणून घेणार आहोत. हा नंबर प्रवाशासाठी एकप्रकारे ओळखपत्रच असतो. तिकिटावर हा नंबर असतो, त्यामुळे प्रवासादरम्यान प्रवाशांना डिजिटल किंवा फिजिकल तिकीट दाखवायचं असतं.
रेल्वे झोननुसार नंबरांचं विभाजन
पीएनआर नंबर १० अंकांचा असतो. जो तीन भागांमध्ये विभागलेला असतो. ज्यात पहिले तीन अंक हे दाखवतात की, तिकीट कोणत्या रेल्वे स्टेशनहून जारी केलं आहे. यात उत्तर रेल्वेसाठी १ ते ३, दक्षिण रेल्वेसाठी ४ ते ६ आणि पूर्व रेल्वेसाठी ७ ते ९ नंबर आहेत.
त्यानंतर शिल्लक राहिलेले ७ नंबर कॉम्प्यूटर सिस्टीम जनरेट यूनिक आयडेंटिफिकेशन नंबर असतात. ज्यात प्रवासाची तारीख, वेळ इत्यादी माहिती दडलेली असते.
पीएनआर नंबरमध्ये छापलेल्या माहितीमध्ये प्रवाशाचं नाव, वय, रेल्वेचं नाव, रेल्वेचा नंबर, वेळ, तिकीट कन्फर्म आहे की नाही याची माहिती, कोच आणि सीटची माहिती असते.