साप झोपतात का? कसे झोपतात? वैज्ञानिकांनी केला आश्चर्यजनक खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 15:53 IST2025-02-08T15:38:06+5:302025-02-08T15:53:48+5:30

How do Snakes sleep? : अनेकांना हा प्रश्न पडतो की, साप झोपतात की नाही? तर वैज्ञानिकांनी एका रिसर्च द्वारे सांगितलं की, सापही झोपतात.

How do Snakes sleep? Scientists make a surprising revelation! | साप झोपतात का? कसे झोपतात? वैज्ञानिकांनी केला आश्चर्यजनक खुलासा!

साप झोपतात का? कसे झोपतात? वैज्ञानिकांनी केला आश्चर्यजनक खुलासा!

How do Snakes sleep? : साप एक असा जीव आहे ज्याच्याबाबत नवनवीन गोष्टी जाणून घेण्याची लोकांना खूप उत्सुकता असते. साप बदला घेतात का? ते साप कसे झोपतात? हे लोकांना जाणून घ्यायचं असतं. सापांचे डोळे नेहमीच उघडे असतात, त्यामुळे अनेकांना हा प्रश्न पडतो की, साप झोपतात की नाही? तर वैज्ञानिकांनी एका रिसर्च द्वारे सांगितलं की, सापही झोपतात. फक्त त्यांची झोपण्याची पद्धत इतर जीवांपेक्षा वेगळी असते.

साप डोळे बंद करू शकत नाहीत, कारण...

सापांबाबत आश्चर्यकारक बाब म्हणजे त्यांच्या डोळ्यांवर पापण्या अजिबात नसतात, ज्यामुळे ते त्यांचे डोळे बंद करू शकत नाहीत. त्यांच्या डोळ्यांना सुरक्षा देण्यासाठी एक पारदर्शी पडदा असतो. जो धूळ आणि इतर गोष्टींपासून डोळ्यांची रक्षा करतो. जेव्हा साप झोपतात तेव्हा त्यांच्या डोळ्यात काही खास बदल दिसून येत नाही. पण त्यांची हालचाल एकदम कमी होते. वैज्ञानिक सांगतात की, झोपेत सापांचा मेंदुची आरामाच्या स्थितीत जातो. ज्यामुळे त्यांच्या शारीरिक क्रिया कमी होतात. त्यांचं हृदय हळूहळू धडधडत आणि ते सुस्त होतात.

अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, साप सुद्धा REM (Rapid Eye Movement) आणि Slow Wave Sleep (SWS) सारख्या झोपेच्या स्थितींमध्ये जाऊ शकतात. ज्यामुळे हे सिद्ध होतं की, ते गाढ झोप घेऊ शकतात. एका दुसऱ्या रिसर्चमधून असंही समोर आलं की, साप एकदाच अनेक तास झोपू शकतात. खासकरून तेव्हा जेव्हा ते जेवण पचवण्याच्या प्रक्रियेत असतात.

नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून समोर आलं की, साप स्वप्नही बघू शकतात. पण हे स्पष्ट होऊ शकलं नाही की, ते स्वप्नात काय बघतात. पण असं मानलं जातं की, त्यांची स्वप्ने शिकार, संभावित धोका किंवा आधीच्या अनुभवांबाबत असू शकतात.

जे साप रात्री सक्रिय असतात, ते दिवसा झोपतात

सापांची झोपण्याची वेळ आणि स्थळ त्यांची प्रजाती व पर्यावरम यावर अवलंबून असतं. जे साप रात्री सक्रिय असतात, ते दिवसा झोपतात. साप अनेक आठवडे किंवा महिने झोपू शकतात. जेव्हा झोपेत त्यांना बाहेर काही हालचाल जाणवली तर ते लगेच प्रतिक्रिया देतात. सापांची झोपण्याची पद्धत इतर जीवांपेक्षा वेगळी असते. ते झोपेतून लगेच जागे होऊन सतर्क होतात.

हे तर स्पष्ट आहे की, सापही झोपतात. पण त्यांची पद्धत वेगळी असते. त्यांचे डोळे उघडे असतात. पण ते मानसिक आणि शारीरिक रूपानं गाढ झोपेत असतात. त्यामुळे जर कधी साप कोणतीही हालचाल न करता बसला असेल तर तो मुळात झोपलेला असू शकतो.

Web Title: How do Snakes sleep? Scientists make a surprising revelation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.