सरडा रंग कसा बदलतो तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या त्यांचं रहस्य....
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 16:41 IST2019-10-29T16:34:22+5:302019-10-29T16:41:09+5:30
सरड्याच्या रंग बदलण्याबाबत तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. इतकेच नाही तर काहींनी सरड्यांना रंग बदलतानाही पाहिलं असेल.

सरडा रंग कसा बदलतो तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या त्यांचं रहस्य....
(Image Credit : ripleys.com)
सरड्याच्या रंग बदलण्याबाबत तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. इतकेच नाही तर काहींनी सरड्यांना रंग बदलतानाही पाहिलं असेल. सरडे हे त्यांना निसर्गाकडून मिळालेल्या खास गिफ्टसाठीही प्रसिद्ध आहेत. पण सरडे रंग कसे बदलू शकतात? तुम्हाला जर हे माहीत नसेल तर निराश होऊ नका. कारण सरड्यांचं रंग बदलण्याचं कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
नैसर्गिक कारण
जगात प्रत्येक जीवाकडे आपली एक खास कला असते. या कलेच्या माध्यमातून ते त्यांचं जीवन जगत असतात. असंच एक खास गिफ्ट सरड्यांना निसर्गाकडून मिळालं आहे. असं मानलं जातं की, सुरक्षेनुसार सरडे त्यांचा रंग बदलतात. शिकाऱ्यांपासून वाचण्यासाठी सरडे जिथे बसलेले असतात, आपोआप ते त्या रंगात स्वत:ला सामावून घेतात. सरडे त्यांचा रंग बदलून स्वत:चा बचाव करतात.
सरडे आपलं पोट भरण्यासाठी शिकारही करतात. शिकार करताना देखील सरडे त्यांचा रंग बदलतात. ज्याने शिकार पळून जात नाही. त्यामुळे सरडे शिकार सहजपणे करू शकतात.
वैज्ञानिक कारण
नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, सरडे त्यांच्या भावनांनुसार रंग बदलतात. राग, आक्रामकता, एकमेकांशी बोलण्यासाठी आणि दुसऱ्या सरड्यांना आपला मूड दाखवण्यासाठी सरडे त्यांचां रंग बदलतात. रिसर्चनुसार, सरडे अनेकदा त्यांचा रंग नाही तर केवळ चमक बदलतात. तेच धोक्याच्या स्थितीत सरडे आपल्या रंगासोबतच आकारही बदलतात. सरडे त्यांचा आकार मोठाही करू शकतात आणि गरज पडेल तर छोटाही करू शकतात.
कसे बदलतात रंग
सरड्यांच्या शरीरात फोटोनिक क्रिस्टल नावाचा एक थर असतो. याने सरड्यांना वातावरणानुसार रंग बदलण्यास मदत मिळते. फोटोनिक क्रिस्टलचा थर प्रकाशाच्या परावर्तनाला प्रभावित करते. ज्याने सरड्यांचा रंग बदललेला दिसतो. जसे की, जेव्हा सरडा जोशमध्ये असतो तेव्हा फोटोनिक क्रिस्टलचा थर सैल पडतो. याने लाल आणि पिवळा रंग परावर्तित होतो.
(Image Credit : bbc.co.uk)
तेच सरडे जेव्हा शांत होतात तेव्हा हे क्रिस्टल प्रकाशातील निळ्या तंरगांना परावर्तित करतात. त्यासोबतच सरड्यांमध्ये क्रिस्टलचा आणखी एक थर असतो, जो इतर थरांपेक्षा मोठा असतो. फार जास्त प्रकाश असल्यावर हा थर सरड्यांना गरमीपासून वाचवतो.