जे घर ७ वर्षाआधी विकलं त्याच्या बेसमेंटमध्ये लपून होती महिला, मालकाला दिसली आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 13:14 IST2025-02-05T12:48:59+5:302025-02-05T13:14:25+5:30
चीनच्या झिंगासूमध्ये राहणाऱ्या ली याला त्याचा घरमालक घराच्या बेसमेंटमध्ये दिसला, ज्याच्याकडून त्याचं घर विकत घेतलं होतं.

जे घर ७ वर्षाआधी विकलं त्याच्या बेसमेंटमध्ये लपून होती महिला, मालकाला दिसली आणि मग...
चीनमधून नेहमीच वेगवेगळ्या विचित्र घटना समोर येत असतात. या घटना अशा असतात ज्यांवर सहजपणे विश्वासही बसत नाही. अशीच एक हैराण करणारी घटना चीनमधून समोर आली आहे. ज्याबाबत वाचून त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. चीनच्या झिंगासूमध्ये राहणाऱ्या ली याला त्याचा घरमालक घराच्या बेसमेंटमध्ये दिसला, ज्याच्याकडून त्याचं घर विकत घेतलं होतं. या घरमालकाकडून ली यानं ७ वर्षाआधी घर खरेदी केलं होतं. ली यानं या व्यक्तीकडून ७ कोटी रूपयांना घर खरेदी केलं होतं.
बेसमेंटमध्ये काय करत होता माजी मालक?
साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट रिपोर्टनुसार, ली यानं ७ वर्षाआधी ज्या व्यक्तीकडून घर खरेदी केलं होतं, ती व्यक्ती गुप्तपणे या घराच्या बेसमेंटमध्ये राहत होती आणि ली याला ७ वर्षांनंतर हे माहीत झालं. ली यानं ज्या व्यक्तीकडून घर खरेदी केलं होतं, त्यानं कधी सांगितलंच नव्हतं की, घरात बेसमेंटही आहे. ली यानं जेव्हा पायऱ्यांमागे एक दरवाजा बघितला. त्यानं चेक केलं तर खाली त्याला बेसमेंट दिसलं.
बेसमेंटमध्ये काय करत होती व्यक्ती?
जेव्हा ली बेसमेंटमध्ये गेली तेव्हा त्याला एक व्हेंटिलेशन, सिस्टीम, लायटिंग आणि स्मॉल बार दिसला. ली यानं घराचे आधीचे मालक झांग यांना संपर्क केला. ली यानं महिलेवर मुद्दामहून ही बाब लपवण्याचा आरोप केला. पण झांग या महिलेनं जेव्हा ली याला जे सांगितलं ते ऐकून त्याला धक्का बसला. झांग म्हणाली की, 'मी हे घर तुम्हाला विकलं होतं, पण त्यात बेसमेंटचा समावेश नव्हता'. महिला ली याला म्हणाली की, ही तिची पर्सनल स्पेस आहे. जी प्रॉपर्टी डीलमध्ये नव्हती. झांग नं ली याला प्रश्न केला की, "जर बेसमेंट तुमचं असेल तर मी रिकाम्या वेळात कुठे आराम करणार? आता ली हे प्रकरण कोर्टात घेऊन गेला आहे.
कोर्टानं काय दिला निर्णय?
हे प्रकरण कोर्टात गेल्यावर न्यायाधीशांनी ली याच्या बाजूनं निर्णय दिला आणि महिलेला दंड भरण्याचा आदेश दिला. आता सोशल मीडियावर या घटनेची चर्चा रंगली आहे. लोकांना विश्वास बसत नाहीये की, असंही होऊ शकतं. अनेकांना प्रश्नही पडला आहे की, महिला बेसमेंटमध्ये कुठून ये-जा करत होती? यावर एका यूजरनं लिहिलं की, गॅरेज आणि बेसमेंटमध्ये काही कनेक्शन असू शकतं.