शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
5
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
6
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
7
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
9
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
10
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
11
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
12
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
13
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
14
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
15
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
16
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
17
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
18
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
19
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
20
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट

पाकिस्तानातील हिंदूंची अनोखी यात्रा, ज्वालामुखीतील माती लावतात अंगावर!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 3:40 PM

आपण अनेकप्रकारच्या यात्रांबाबत ऐकलं आहे. अमरनाथ यात्रा असो वा चारधाम यात्रा, धार्मिक आस्थेशी निगडीत या यात्रांचा अनुभव लोकांसाठी फारच वेगळा असतो.

आपण अनेकप्रकारच्या यात्रांबाबत ऐकलं आहे. अमरनाथ यात्रा असो वा चारधाम यात्रा, धार्मिक आस्थेशी निगडीत या यात्रांचा अनुभव लोकांसाठी फारच वेगळा असतो. वेगवेगळ्या श्रद्धा आणि अंधश्रद्धा सोबत घेऊन लोक या यात्रा करत असतात. अशीच एका पाकिस्तानातील यात्रा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

या व्हिडीओमध्ये जे लोक दिसत आहेत ते एका तीर्थयात्रेचा भाग आहेत. ही यात्रा म्हणजे हिंगलाज मातेची यात्रा.

हिंगलाज माता मंदिर महत्त्व

पाकिस्तानातील हिंदु लोकांसाठी हिंगलाज मातेवर फार भक्ती आहे. असे म्हणतात की, विष्णुने जेव्हा माता सतीच्या शरीराचे ५१ तुकडे केले होते, त्यावेळी मातेचं शरीर ज्या ठिकाणी पडलं होतं तिथेच आज हिंगलाज मातेचं मंदिर आहे. एप्रिल महिन्यात साधू आणि योगी या मंदिरात जाण्यासाठी ४ दिवसांच्या यात्रेचे आयोजन करतात. या यात्रेत भारत आणि पाकिस्तानातील अनेक भाविक सहभागी होतात. 

ज्वालामुखीचीही करतात पूजा

(Image Credit : National Geographic)

कराचीपासून ३३० किलोमीटर अंतरावर स्थित हिंजलाज मातेच्या मंदिराच्या मार्गात ३०० फूट उंच ज्वालामुखी आहे. या ज्वालामुखीला चंद्रगुप असं नाव आहे. 

(Image Credit : Roads And Kingdoms)

लोकांची अशी भावना आहे की, हा ज्वालामुखी इच्छा पूर्ण करतो. भाविक ज्वालामुखीमध्ये नारळ आणि फूल टाकतात. काही लोका ज्वालामुखीतून निघणारी ओली माती अंगावर लावतात, सोबत नेतात आणि त्याने छोटसं घरही बांधतात. दूरदूरपर्यत एकही झाड दिसत नसलेल्या या ठिकाणाची यात्रा फारच कठीण आहे. वादळ, जोरदार वारा यामुळे मंदिरात पोहोचण्यात अनेक अडचणी येतात. आता या यात्रेची स्टोरी नॅशनल जिओग्राफीवर दाखवली जाणार आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानJara hatkeजरा हटकेVolcanoज्वालामुखी