अहो! आश्चर्यम,  गायीला झाले जुळे, निसर्गाचा चमत्कार पाहण्यासाठी बघ्याची गर्दी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 05:52 IST2017-09-11T05:51:17+5:302017-09-11T05:52:16+5:30

आगाशी येथे एका जर्सी गाईला जुळी वासरे झाली आहेत. अशा प्रकारची घटना ही दुर्मीळ असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनीही आगाशी येथे जाऊन याची माहिती घेतली.

Hey! Surprisingly, the cows twisted, the miracle of the miracle of nature | अहो! आश्चर्यम,  गायीला झाले जुळे, निसर्गाचा चमत्कार पाहण्यासाठी बघ्याची गर्दी  

अहो! आश्चर्यम,  गायीला झाले जुळे, निसर्गाचा चमत्कार पाहण्यासाठी बघ्याची गर्दी  

पारोळ -  आगाशी येथे एका जर्सी गाईला जुळी वासरे झाली आहेत. अशा प्रकारची घटना ही दुर्मीळ असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनीही आगाशी येथे जाऊन याची माहिती घेतली.
जोडव्यवसाय म्हणून आगाशी येथील पोलीस पाटील असलेले चंदू पाटील या कृतिशील शेतक-याने दुधाचा व्यवसाय सुरू केला. त्यासाठी त्यांनी ५ देशी गार्इंसह २० जर्सी गाईही विकत घेतल्या आहेत. सोबत काही म्हशीही दुग्ध व्यवसायासाठी त्यांनी घेतल्या आहेत. त्यातील एका जर्सी गाईने मंगळवारी एकाच वेळी दोन वासरांना जन्म दिला. ही दोन्ही वासरे वेगवेगळ्या रंगांची आहेत. याअगोदर मात्र या जर्सी गाईने दोन वेळा एकाएकाच वासरांना जन्म दिला आहे.
एकाच वेळी दोन वासरे जन्माला येणे ही लाखातील एखादी घटना असल्याचे आगाशी येथील पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.शंकर विरकर यांनी सांगितले.
यातील एक वासरू १२ किलो तर दुसरे ११ किलो वजनाचे असून दोंन्ही वासरे व गाय सुदृढ व सुखरुप आहेत. सकस आहार, योग्य निगा आणि वेळेवर औषधोपचार या त्रिसूत्रीचा वापर करून केलेले संगोपन आणि तज्ञांच्या सल्ल्याने घेतलेली गाईची गर्भावस्थेतील विशेष काळजी यामुळे ही गाय व दोनही वासरे ठणठणीत असून, ती दररोज १५ ते १८ लिटर दूध देते आहे. साधारणपणे ५ टक्के गायीमध्ये जुळे होण्याची शक्यता असते. गुणसूत्रांमधील बदल व अनुवंशिकता या घटकांचा यावर परिणाम होतो. अशा गायी या आर्थिकदृष्ट्या फायदेशीरही ठरतात, असे विरकर यांनी सांगितले.

Web Title: Hey! Surprisingly, the cows twisted, the miracle of the miracle of nature

टॅग्स :Indiaभारत