इथे अजूनही आहे घरातील सगळ्याच भावांसोबत एकाच महिलेचं लग्न लावण्याची प्रथा, कसा चालतो संसार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 15:02 IST2025-03-11T15:01:53+5:302025-03-11T15:02:24+5:30
Interesting Facts : हिमाचलमध्ये आणि तिबेटच्या काही भागात वेगवेगळ्या नावांनी ही प्रथा पार पाडली जाते. इथे एका महिलेचं लग्न एकत्र अनेक भावांसोबत लावून दिलं जातं.

इथे अजूनही आहे घरातील सगळ्याच भावांसोबत एकाच महिलेचं लग्न लावण्याची प्रथा, कसा चालतो संसार?
Interesting Facts : महाभारत मालिकेतील प्रत्येक पात्र अनेकांच्या स्मरणात असेल. यातील पाच पांडवांसोबतच द्रोपदी सुद्धा सगळ्यांना आठवत असेल. द्रोपदी पाच पांडव असलेल्या भावांची पत्नी होती. महत्वाची बाब म्हणजे भारतात आजही काही भागांमध्ये बहुपती प्रथा सुरू आहे. हिमाचलमध्ये आणि तिबेटच्या काही भागात वेगवेगळ्या नावांनी ही प्रथा पार पाडली जाते. इथे एका महिलेचं लग्न एकत्र अनेक भावांसोबत लावून दिलं जातं.
हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागांमध्ये बहुपती प्रथा कमी झाली आहे. पण अजूनही आहे. तिबेटमध्येही काही ठिकाणी अशी लग्ने होतात. हिमाचल आणि उत्तरखंडच्या काही भागांमध्ये आजही एक महिलेला पाच ते सात पती असतात. दक्षिण भारतातही काही आदिवासी समुदायांमध्ये ही प्रथा आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार, या प्रथेमध्ये महिलेला पतीच्या भावांसोबतही लग्न करावं लागतं. आधी महिला परिवारातील एका पुरूषासोबत लग्न करते. त्यानंतर तिचं लग्न त्याच्या भावांसोबत होतं.
कसा चालतो संसार?
आता कुणालाही हा प्रश्न पडेल की, अनेक पती असलेला हा संसार चालत कसा असेल? चला तेच जाणून घेऊ. तर सामान्य या लग्नात सगळेच पती आलटून पालटून पत्नीसोबत वेळ घालवतात. महत्वाची बाब म्हणजे येथील महिला या प्रथेला विरोधही करत नाही. रिपोर्टनुसार, उत्तर भारताच्या हिमाचलच्या किन्नोर आणि उत्तराखंडमध्ये चीनला लागून असलेल्या भागात ही प्रथा आहे.
हिमाचलमध्ये बहुपती प्रथेत एकाच छताखाली, एकाच राहणाऱ्या परिवारातील भाऊ एकाच महिलेसोबत लग्न करतात. याच महिलेसोबत वैज्ञानिक जीवन जगतात. जर महिलेने अनेक पतींपैकी एखाद्याचं कोणत्या कारणानं निधन झालं तर महिलेला शोक व्यक्ती करू दिला जात नाही.
दरवाज्यावर टोपी आणि...
लग्नानंतर भावांमध्ये या वैवाहिक जीवनाबाबत सहमती होते. वाद होऊ नये म्हणून यात एक टोपी महत्वाची भूमिका बजावते. जर महिलेला एकापेक्षा जास्त पती असतील, अशावेळी महिलेसोबत कोण आहे हे माहीत पडण्यासाठी तो भाऊ दरवाज्यावर एक टोपी लटकवली जाते. अशात दुसरं कुणी आत जात नाही.
हिमाचल प्रदेश के किन्नौरमध्ये आजही अशी लग्ने होतात. एका मुलाखतीत सांगण्यात आलं की, अशा लग्नांना इथे कायदेशीर मान्यता नाही. पण समाजातील लोक ही प्रथा पाळतात. या विवाहाला इथे ञमफो पोसमा असं म्हटलं जातं.
घटस्फोटाचं काय?
या लग्नांमध्ये घटस्फोटाची सोयही असते. यासाठी सगळ्यांना सोबत जाऊन घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण करावी लागते. यात दोन्हीकडील लोक समोर बसतात. एक वाळलेली छोटी फांदी घेतात आणि ती तोडली जाते. याचा अर्थ घटस्फोट झाला. त्यानंतर संबंध तुटतात.