शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

गर्लफ्रेण्डला लाँग ड्राइव्हवर घेऊन जायला त्याने चोरल्या 16 बाईक्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2017 14:10 IST

बंगळुरू, दि. 24- प्रेमामध्ये सगळं काही माफ असतं असं म्हणतात. तसंच आपलं प्रेम सिद्ध करण्यासाठी कुठल्याही थराला जातात याची अनेक उदाहरण आपण पाहतो. तसाच आणखी एक प्रकार समोर आला आहे. आपल्या गर्लफ्रेण्डला लाँग ड्राइव्हवर घेऊन जाण्यासाठी एका 24 वर्षीय मुलाने चक्क 16 बाईक्सची चोरी केल्याचं समोर आलं आहे. के.जी नगर पोलिसांनी ...

ठळक मुद्दे आपल्या गर्लफ्रेण्डला लाँग ड्राइव्हवर घेऊन जाण्यासाठी एका 24 वर्षीय मुलाने चक्क 16 बाईक्सची चोरी केल्याचं समोर आलं आहे. के.जी नगर पोलिसांनी एका व्यक्तीकडून 16 बाईक्स ताब्यात घेतल्या.

बंगळुरू, दि. 24- प्रेमामध्ये सगळं काही माफ असतं असं म्हणतात. तसंच आपलं प्रेम सिद्ध करण्यासाठी कुठल्याही थराला जातात याची अनेक उदाहरण आपण पाहतो. तसाच आणखी एक प्रकार समोर आला आहे. आपल्या गर्लफ्रेण्डला लाँग ड्राइव्हवर घेऊन जाण्यासाठी एका 24 वर्षीय मुलाने चक्क 16 बाईक्सची चोरी केल्याचं समोर आलं आहे. के.जी नगर पोलिसांनी एका व्यक्तीकडून 16 बाईक्स ताब्यात घेतल्या.

सराबंदेपाल्या भागात राहणाऱ्या वासिम अक्रम या चोवीस वर्षीय तरूणाकडून पोलिसांनी या 16 बाईक्स जप्त केल्या. आपल्या गर्लफ्रेण्डला खूश करण्यासाठी हा सगळा प्रकार करत असल्याचं त्याने कबूल केलं. गेल्या वर्षभरापासून वासिम गाड्यांची चोरी करत होता. त्याच्या गर्लफ्रेण्डला लाँग ड्राइव्हर नेण्यासाठी तो बाईक्सची चोरी करत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. आपण ज्या गाडीवरून फिरत आहोत ती गाडी चोरीची आहे, याची कल्पना वासिमच्या गर्लफ्रेण्डला नव्हती, असंही पोलिसांनी सांगितलं.

गर्लफ्रेण्डला फिरविण्यासाठी चोरी करण्याचा हा प्रकार उघड झाल्यानंतर असाच आणखी एक प्रकार समोर आला. बाईक स्टंटची आवड पूर्ण करण्यासाठी काही जण गाड्यांची चोरी करत असल्याचं समोर आलं आहे. रागीगुड्डा झोपडपट्टीत राहणारे रणजीत इलंगोवन आणि मार्टीमुत्तू मुलीस्वामी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना 2015 साली पहिल्याच वर्षात नापास झाले. त्यानंतर त्या दोघांनी कॉलेज सोडलं होतं. तेव्हापासून ते दोघं गाड्या चोरी करत होते, अशी माहिती मिळते आहे. त्या दोघांनी शहरातील विविध भागातून 25 गाड्यांची चोरी केली आहे. 

काही दिवसांपूर्वी जयानगर परिसरात काही मुलं बाईक स्टंट करत असल्याची माहिती काही स्थानिकांनी पोलिसांना दिली होती. स्थानिकांच्या माहितीनुसार पोलीस घटनास्थळी पोहचल्यावर त्या दोघांनी तेथून पळ काढला. चोरीच्या झालेल्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने पोलिसांना त्या दोघांची ओळख पटली होती. चौकशी दरम्यान त्या दोघांनीही चोरी केल्याचं कबूल केलं. बाईकची चोरी करून स्टंट करायचे आणि नंतर परत ती बाईक नेऊन ठेवायची, अशी आम्हाला सवय असल्याचं त्या दोघांनी सांगितलं. 

टॅग्स :theftचोरीPoliceपोलिसCrimeगुन्हा