'एलिअन्ससाठी आपण बाहुले...', हार्वर्ड यूनिव्हर्सिटीच्या प्रोफेसरांचा अजब दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2023 14:47 IST2023-09-28T14:47:11+5:302023-09-28T14:47:33+5:30
एलिअनबाबत नेहमीच वेगवेगळे दावे केले जातात. अशात आता एक दावा हॉवर्ड यूनिवर्सिटीच्या प्रोफेसरनी केला आहे.

'एलिअन्ससाठी आपण बाहुले...', हार्वर्ड यूनिव्हर्सिटीच्या प्रोफेसरांचा अजब दावा
मनुष्यांनी विज्ञानाच्या माध्यमातून तसे तर रहस्य उलगडली आहेत. पृथ्वीनंतर आता त्यांची नजर अंतराळातील रहस्य शोधण्याकडे आहे. अंतराळाचा नाव समोर येताच एलिअनचा विषय निघतोच. एलिअनबाबत नेहमीच वेगवेगळे दावे केले जातात. अशात आता एक दावा हॉवर्ड यूनिवर्सिटीच्या प्रोफेसरनी केला आहे.
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, हार्वर्ड यूनिवर्सिटीचे प्रोफेसर एवी लोएब (Avi Loeb) यांनी दावा केला की, मनुष्य आणि एलिअन्समध्ये एक वेगळ्याच प्रकारचा संबंध आहे. त्यांचं मत आहे की, एलिअन आपल्या मनुष्यांचं जीवन कंट्रोल करत आहेत. जसे की, कॉम्प्युटर गेम्सना रिमोटने कंट्रोल केलं जातं. हे ऐकण्यासाठी एखाद्या सायन्स फिक्शनसारखं वाटतं. त्यांनी असाच दावा केला आहे.
मनुष्य आणि एलिअन्सच्या संबंधाबाबत सिमुलेशन थेअरी बनवण्यात आली आहे. या थेअरीनुसार, आर्टिफिशिअल इंटॅलिजन्समुळे मनुष्य आणि एलिअन्स यांच्यातील संबंध थोडा स्पष्ट झाला आहे. यानुसार मनुष्यांचं डिजिटल जगणंच आपलं नशीब आहे. आतापर्यंत आपल्या जीवनाबाबत जे काही आपण जाणलं ते सगळं खोटं आहे. एलिअन्स द्वारे किडनॅप करण्यात आलेल्या एका व्यक्तीनेही हाच दावा केला होता की, सिमुलेशनला एक रहस्य बनवण्यासाठीही मेहनत घेतली जात आहे. प्रोफेसर लोएब यांचा दावा आहे की, एलिअन्स मनुष्यांच्या आर्टिफिशियल इंटेलिजेंससोबत संबंध स्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण अजून त्यांना यश मिळालं नाही.
आधीही झाले असे दावे
स्वीडनमधील निक बोस्ट्रॉम (Nick Bostrom) ने 2003 मध्ये अशीच थेअरी सांगितली होती आणि म्हणाला होता की, एलिअन्स आणि मनुष्यांच्या या थेअरीचं समर्थन इलॉन मस्कही करतो. त्याने आधीही आपल्या मुलाखतींमध्ये सांगितलं की, एलिअन आपल्यासोबतच राहतात आणि होऊ शकतं की, आपल्याला ते माहीत नाहीत.