शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
4
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
5
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
6
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
7
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
8
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
9
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
10
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
11
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air
12
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
13
"२.४६ कोटी घ्यायचेत"; बँकेच्या बाथरुममध्ये बिझनेसमनने स्वत:वर झाडल्या गोळ्या, कारण...
14
मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर
15
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
16
आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती
17
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
18
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
19
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
20
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला

#HappyNewYearWishes : प्रियजनांना नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी हे काही 'मेसेज'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2017 11:34 IST

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात तंत्रज्ञानाच्या मदतीने एकमेकांना येणऱ्या वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी असे काही कोट्स आणि मेसेज वापरु करता.

ठळक मुद्देसरत्या वर्षाचा निरोप घेण्यासाठी आणि नववर्षाचं स्वागत करण्यासाठी लोकं वेगवेगळ्या गोष्टींचा आधार घेतात.कुणी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देतं तर कुणी भेटवस्तु देऊन. तर कुणी या तंत्रज्ञानाच्या जगात फोन मेसेज इत्यादींची मदत घेतं.आता तर इंटरनेटच्या सहज उपलब्धतेमुळे लोक सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टीव्ह असतात आणि त्याची मदत घेऊनच आपल्या जवळच्यांना शुभेच्छा देतात.

मुंबई : २०१७च्या समारोपाला आता अवघे काही तास बाकी आहेत. अवघ्या काही तासात २०१८ चा सूर्योदय होणार आहे. लोकांचे ३१ डिसेंबरच्या रात्रीचे प्लॅन ठरले आहेत तर काहींचे अजून बाकी आहेत. यादिवसांत लोकं एकमेकांना भेटतात, गप्पा मारतात. एकत्र जेवण करतात, भेटवस्तुंची देवाणघेवाण होते. सरत्या वर्षातील वाईट किंवा कटु गोष्टींना अलविदा करीत लोक येत्या वर्षाला आनंदुन स्वागत करतात.

फटाके फोडले जातात आणि नाच-गात नववर्षाचं स्वागत केलं जातं. आजकाल तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा जमाना असल्याने त्यावरुनही दूर-दूरच्या लोकांना शुभेच्छा दिल्या जातात. आम्ही तुमच्यासाठी काही न्यु इअर मेसेज घेऊन आलो आहोत. सोशल मीडियावरुन प्रियजनांना शुभेच्छा देण्यासाठी या मेसेजचा वापर तुम्ही करु शकता. हा दिवस आपण आपल्या जवळच्या लोकांसोबत साजरा करतो. जगभरात हा दिवस साजरा करण्याची पध्दत वेगवेगळी असली तरी हेतु एकच असतो. आम्ही अशी आशा करतो की येणारं हे वर्ष तुमच्या आयुष्यात आनंद आणि समाधान घेऊन यावं.

सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी आपण जमेल तितक्या लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो. ज्यांच्याशी वर्षभर आपला संपर्क होत नाही त्यांनाही आपण नववर्षाच्या शुभेच्छा देतो. अशातुन काही दुरावलेली नाती पुन्हा जवळ येतात. आपल्या कुटूंबांसोबत, नातेवाईकांसोबत आणि मित्र परिवारासोबत वेळ घालवला जातो, एकमेकांना भेटवस्तु दिल्या जातात. हॉटेलमध्ये, फार्महाऊसमध्ये किंवा कुणाच्या घरी रुचकर जेवणाचा आस्वाद घेतला जातो. त्यासाठी बराच पैसा खर्च केला जातो. बरेच दिवस याचे प्लॅनिंग चालु असते.

यादिवशी कोणाविषयी मनात कटुता न ठेवता सर्वांना शुभेच्छा दिल्या जातात. प्रत्येकाला नव्या वर्षात सुख, समाधान, संपत्ती आणि निरोगी आयुष्य लाभो अशी इच्छा व्यक्त केली जाते. खरंतर इंग्रजी कालगणनेनुसार ही नववर्षाची सुरुवात असते आणि हिंदु वर्षाची सुरुवात गुढीपाडव्याने होते. मात्र इंग्रजी कालगणना आपल्या दैंनदिन व्यवहाराचा महत्त्वाचा भाग असल्याने हा दिवस मोठ्या प्रमाणावर साजरा होतो.  

आम्ही आशा करतो की, नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी या इमेजेसची तुम्हाला मदत होईल. त्यात असल्याप्रमाणे खरंच तुम्हा सर्वांना येणारं वर्ष भरभराटीचं आणि प्रगतीचं जावो. तुमच्यापासून दुरावलेली माणसं तुमच्या जवळ येवो. सरत्या वर्षातल्या वाईट गोष्टी ३१ डिसेंबरच्या रात्रीसोबत निघून जावोत आणि १ जानेवारीची पहाट तुमच्या आयुष्यातली सर्वात सुंदर पहाट असो. 

लोकमततर्फे सर्वांना नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

टॅग्स :New Year 2018नववर्ष २०१८Social Mediaसोशल मीडियाNew Yearनववर्षInternetइंटरनेट