Video : राज्य परिवहन मंडळाची बस पाण्यात अडकली; बुल्डोजरच्या सहाय्यानं बाहेर काढावी लागली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 12:29 PM2020-08-13T12:29:18+5:302020-08-13T12:30:05+5:30

कोरोना व्हायरसच्या संकटात समुद्रकिनारी असलेल्या राज्यांना पावसानं चांगलंच झोडपलं आहे. आगामी दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली ...

Gujarat: A state transport bus being pulled by a proclainer after it got stuck under a waterlogged bridge near Rajkot's Gondal | Video : राज्य परिवहन मंडळाची बस पाण्यात अडकली; बुल्डोजरच्या सहाय्यानं बाहेर काढावी लागली

Video : राज्य परिवहन मंडळाची बस पाण्यात अडकली; बुल्डोजरच्या सहाय्यानं बाहेर काढावी लागली

Next

कोरोना व्हायरसच्या संकटात समुद्रकिनारी असलेल्या राज्यांना पावसानं चांगलंच झोडपलं आहे. आगामी दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे आणि त्यामुळे जागोजागी पाणी तुंबल्याचे दिसत आहे. ANI वर सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, त्यात पावसामुळे तुंबलेल्या पाण्यात राज्य परिवहन बस अडकली आणि ती बाहेर काढण्यासाठी चक्क बुल्डोजरची मदत घेण्यात आली. हे बचावकार्य सुरू असताना बघ्यांनी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला.

गुजरातमधील राजकोट गोंडल पुलाखाल राज्य परिवहनची बस पाण्यात अडकली होती. बुल्डोजरच्या सहाय्यानं तिला बाहेर काढण्यात आले, पण त्यावेळी पुलावर बघ्यांनी तौबा गर्दी केली होती. कोरोना व्हायरसच्या संकटात लोकांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाला हरताळ फासल्याचे दिसले. 

पाहा व्हिडीओ...

 
येत्या 16 व 17 ऑगस्टला गुजरात येथे मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं व्यत्क केला आहे. मंगळवारी येथे 481.4 मीमी पाऊस पडला. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

खरंच, 2021चा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप भारतात होणार? ICCनं तयार ठेवलाय बॅकअप प्लान! 

IPL 2020 : मोठी बातमी; टीम इंडियाच्या त्रिशतकवीर फलंदाजाला झाला होता कोरोना

England vs Pakistan : फॅनसोबतच्या एका फोटोमुळे पाकिस्तानच्या संपूर्ण संघावर संकट?  

विराट कोहलीचा फोटो असलेल्या जाहिरातीवर BCCIची कारवाई; जाणून घ्या नेमकं कारण 

Web Title: Gujarat: A state transport bus being pulled by a proclainer after it got stuck under a waterlogged bridge near Rajkot's Gondal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.