England vs Pakistan : फॅनसोबतच्या एका फोटोमुळे पाकिस्तानच्या संपूर्ण संघावर संकट?; खेळाडूनं मोडला कोरोना नियम

England vs Pakistan : इंग्लंड-वेस्ट इंडिज मालिके दरम्यान जोफ्रा आर्चरनं कोरोनाचे नियम मोडले होते आणि त्यामुळे त्याला दुसऱ्या कसोटीतून संघाबाहेर केले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 11:30 AM2020-08-13T11:30:35+5:302020-08-13T11:32:22+5:30

whatsapp join usJoin us
England vs Pakistan : Pakistan's Mohammad Hafeez Breaches Biosecurity Protocol In England, Visits Golf Course | England vs Pakistan : फॅनसोबतच्या एका फोटोमुळे पाकिस्तानच्या संपूर्ण संघावर संकट?; खेळाडूनं मोडला कोरोना नियम

England vs Pakistan : फॅनसोबतच्या एका फोटोमुळे पाकिस्तानच्या संपूर्ण संघावर संकट?; खेळाडूनं मोडला कोरोना नियम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

England vs Pakistan : पहिल्या कसोटीतील पराभवानंतर पाकिस्तान संघाला मालिका विजयासाठी आजपासून सुरू होणारी कसोटी जिंकावी लागणार आहे. पहिल्या कसोटीत डावात शतकी आघाडी घेऊनही पाकिस्तानला यजमान इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे तीन सामन्यांची मालिका वाचवण्यासाठी पाकिस्तानचा सर्व जोर लावावा लागणार आहे. पण, त्याआधी संपूर्ण संघाचे टेंशन वाढवणारा प्रसंग घडला. पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू मोहम्मद हाफिजनं जैव सुरक्षिततेचा नियम मोडून फॅन्ससोबत सेल्फी काढली. त्यामुळे हाफिजला सेल्फ आयसोलेट व्हावे लागले आहे.

इंग्लंड-वेस्ट इंडिज मालिके दरम्यान जोफ्रा आर्चरनं कोरोनाचे नियम मोडले होते आणि त्यामुळे त्याला दुसऱ्या कसोटीतून संघाबाहेर केले होते. आता हाफिजवरही तिच कारवाई होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या कसोटीला सुरुवात होण्यापूर्वी बुधवारी पाकिस्तानी खेळाडू हॉटेलच्या गोल्फ कोर्सला भेट दिली. त्यावेळी हाफिजनं एका फॅन्ससोबत फोटो काढला. त्यानं दोन मीटर अंतर ठेवण्याचा नियम मोडला. आता 39 वर्षीय हाफिजची कोरोना चाचणी होणार आहे आणि आज त्याचा रिपोर्ट येणं अपेक्षित आहे.

कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह येईपर्यंत हाफिजला सेल्फ आयसोलेट रहावे लागणार आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळानं सांगितलं की,''आमच्याकडे पुरावा म्हणून हाफिज आणि फॅन्सचा फोटो आहे. त्यात त्यानं सोशल डिस्टन्सिंगचा नियम मोडल्याचं दिसत आहे. त्यामुळे त्याची कोरोना चाचणी करण्यात येईल आणि रिपोर्ट निगेटिव्ह येईपर्यंत तो सेल्फ आयसोलेट होणार आहे. अन्य खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी हे गरजेचे आहे.''

पण, हाफिजच्या संपर्कात आलेल्या खेळाडूंमध्ये आता भीतीचं वातावरण आहे. पीसीबीनं याबाबत कोणतेही भाष्य केलेले नाही.  


पहिल्या कसोटीत इंग्लंडचा विजय
पाहिल्या कसोटीत शान मसूदच्या शतकाच्या जोरावर पाकिस्ताननं पहिल्या डावात 326 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव 219 धावांत गुंडाळून पाकिस्ताननं 107 धावांची आघाडी घेतली. पण, त्यांना या संधीचं सोनं करता आलं नाही आणि पाकिस्तानला दुसऱ्या डावात 167 धावाच करता आल्या. त्यांनी इंग्लंडसमोर 277 धावांचं आव्हान उभं केलं. इंग्लंडचे 5 फलंदाज 117 धावांवर माघारी परतले होते, परंतु जोस बटलर आणि ख्रिस वोक्स यांनी शतकी भागीदारी करून संघाचा विजय पक्का केला. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

खरंच, 2021चा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप भारतात होणार? ICCनं तयार ठेवलाय बॅकअप प्लान! 

IPL 2020 : मोठी बातमी; टीम इंडियाच्या त्रिशतकवीर फलंदाजाला झाला होता कोरोना

Web Title: England vs Pakistan : Pakistan's Mohammad Hafeez Breaches Biosecurity Protocol In England, Visits Golf Course

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.