इथे खलेआम विकले जातात पती-पत्नी, लागतो नवरी-नवरीदेवांचा बाजार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2024 17:39 IST2024-03-11T17:39:17+5:302024-03-11T17:39:51+5:30
इथे केवळ तरूणी आपल्यासाठी पती शोधतात असं नाही तर तरूणही आपल्यासाठी पत्नी शोधतात. इथे नवरी-नवरदेवांचे परिवारही उपस्थित असतात.

इथे खलेआम विकले जातात पती-पत्नी, लागतो नवरी-नवरीदेवांचा बाजार...
सध्या देशात लग्नांचा सीझन सुरू आहे. कुणी आपापल्या पसंतीने लग्न करतात तर कुणी परिवाराच्या पंसतीने. पण तुम्हाला एखाद्या अशा ठिकाणाबाबत माहीत आहे का जिथे पती-पत्नी विकले जातात? यासंबंधीच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात बघू शकता की, कसे लोक या बाजारात येऊन आपल्यासाठी नवरदेव किंवा नवरी शोधतात. हा व्हिडीओ चीनच्या शांघायमधील आहे.
इथे केवळ तरूणी आपल्यासाठी पती शोधतात असं नाही तर तरूणही आपल्यासाठी पत्नी शोधतात. इथे नवरी-नवरदेवांचे परिवारही उपस्थित असतात. शांघायच्या या नवरी-नवरदेवांच्या बाजाराचा व्हिडीओ हॅरा जगार्ड (Harry Jaggard) नावाच्या अमेरिकन तरूणाने त्याच्या इन्स्टावर शेअर केला आहे.
हॅरीने जेव्हा याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला एका चायनीज व्यक्तीने सांगितलं की, इथे प्रत्येकाचा आवडीचा आपला वेगळा दृष्टीकोन आहे. हॅरी तिथे असलेल्या इतरही लोकांशी बोलतो. एका व्यक्तीने सांगितलं की, तो इथे पत्नीच्या शोधात आला आहे. नंतर हॅरी एका लाईनमध्ये बसलेले पुरूष आणि महिला दाखवतो.
लोकांना हा व्हिडीओ खूपच आवडला. आतापर्यंत या व्हिडिओला 1 कोटी 38 लाख पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तेच 4 लाख 22 हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. तर शेकडो लोकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत.