ना बँड, बाजा, वरात, ना घोडा... नवरदेवाने केली थेट शवपेटीतून एन्ट्री; Video पाहून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2022 13:01 IST2022-11-20T12:59:36+5:302022-11-20T13:01:47+5:30

नवरदेव म्हटला की तो बँड, बाजा आणि वरातीसह घोडा किंवा मग आलिशान गाडीतून येतो. पण आता चक्क एका नवरदेवाने शवपेटीतून एन्ट्री केल्याची घटना समोर आली आहे.

groom arrives in a coffin at wedding venue people shocked to see the viral video | ना बँड, बाजा, वरात, ना घोडा... नवरदेवाने केली थेट शवपेटीतून एन्ट्री; Video पाहून व्हाल हैराण

ना बँड, बाजा, वरात, ना घोडा... नवरदेवाने केली थेट शवपेटीतून एन्ट्री; Video पाहून व्हाल हैराण

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा क्षण असतो. त्यामुळेच लोक आपला हा क्षण आणखी खास करण्यासाठी कोणतीच कसर सोडत नाहीत. आपलं लग्न हे इतरांपेक्षा वेगळं आणि युनिक असावं. ते नेहमीच सर्वांच्या लक्षात राहावं असं वाटत असतं. काही जण यासाठी डेस्टिनेशन वेडिंग देखील करतात. तर काही जण भन्नाट गोष्टी करतात. लग्नाचे विविध किस्से आणि व्हि़डीओ हे सतत सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ आता तुफान व्हायरल होत आहे. 

नवरदेव म्हटला की तो बँड, बाजा आणि वरातीसह घोडा किंवा मग आलिशान गाडीतून येतो. पण आता चक्क एका नवरदेवाने शवपेटीतून एन्ट्री केल्याची घटना समोर आली आहे. लग्नाच्या ठिकाणी नवरदेव एका कॉफिन बॉक्समधून पोहोचल्याचं पाहायला मिळालं. या चक्रावून टाकणाऱ्य़ा घटनेचा व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला की त्याला कॉफिन बॉक्समध्ये ठेवलं जातं. 

सर्व अंत्यविधी पूर्ण झाले की हा मृतदेह कॉफिन बॉक्ससहित जमिनीत दफन केला जातो. पण आता  नवरदेवाने कॉफिन बॉक्सचा उपयोग वेडिंग व्हेन्यूवर जाण्यासाठी केल्याने सध्या या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या माहितीनुसार, हा विचित्र प्रकार अमेरिकेतला आहे. एंटरटेन स्कॉलर्स या नावाच्या यू-ट्यूब अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. 1 मिनिट 11 सेकंदांच्या या व्हिडिओला हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: groom arrives in a coffin at wedding venue people shocked to see the viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.