बाबो! स्ट्रीट फूडच्या नावावर इथे विकला जात आहे भाजलेला बर्फ, आवडीने खातात लोक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 17:44 IST2023-09-05T17:43:23+5:302023-09-05T17:44:42+5:30
Social Viral : या अनोख्या डिशचं नाव ग्रिल्ड आइस म्हणजे भाजलेला बर्फ आहे. ऐकायलाच इतकं अजब वाटतं.

बाबो! स्ट्रीट फूडच्या नावावर इथे विकला जात आहे भाजलेला बर्फ, आवडीने खातात लोक!
Social Viral : सोशल मीडियावर जगभरातील वेगवेगळ्या स्ट्रीट फूडची चर्चा होत असते. वेगवेगळ्या व्हिडिओत हे वेगवेगळे फूड दाखवले जातात. पण सध्या चीनमधील एक असा पदार्थ चर्चेत आहे ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. ही डीश बघून लोकही हैराण झाले आहेत.
या अनोख्या डिशचं नाव ग्रिल्ड आइस म्हणजे भाजलेला बर्फ आहे. ऐकायलाच इतकं अजब वाटतं. कुणालाही प्रश्न पडेल की, बर्फ कसा भाजला जाऊ शकतो. पण चीनमधील काही मीडिया रिपोर्टनुसार, जियांग्शी प्रांतातील नानचांगमधील एका स्ट्रीट फूड स्टॉलवर हा पदार्थ मिळत आहे.
यात बर्फाचे मोठे तुकडे ग्रिलवर भाजले जातात. प्लेटमध्ये वाढण्याआधी ते सॉस आणि मसाल्यात भाजले जातात. उन्हाळ्याच्या दिवसात ही डिश फार फेमस आहे.
एका मीडिया हाऊसने हे बनवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला. तेव्हा त्याने सांगितलं की, लोकांना थंड्याची जाणीव करून देण्यासाठी त्याने ही डिश गंमतीने बनली होती. पण लोकांना डिश खूपच आवडली. त्यामुळे त्याने ती तयार करणं सुरूच ठेवलं. महत्वाची बाब म्हणजे ही डिश लोकांना मोफत दिली जाते.