आज्जीची काठी बंदुकीला भारी, गोळीबार करणाऱ्यांना पळवून लावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 06:42 IST2023-11-30T06:34:33+5:302023-11-30T06:42:02+5:30

घराबाहेर गोळीबाराचा आवाज आला तर क्वचितच कोणी बाहेर पडेल. मात्र, हरयाणातील एका आजीने धाडस दाखवत गोळीबार करणाऱ्या बदमाशांना मारण्यासाठी काठी घेऊन धाव घेतली.

Grandma's stick, heavy on the gun, drove the shooters away | आज्जीची काठी बंदुकीला भारी, गोळीबार करणाऱ्यांना पळवून लावलं

आज्जीची काठी बंदुकीला भारी, गोळीबार करणाऱ्यांना पळवून लावलं

घराबाहेर गोळीबाराचा आवाज आला तर क्वचितच कोणी बाहेर पडेल. मात्र, हरयाणातील एका आजीने धाडस दाखवत गोळीबार करणाऱ्या बदमाशांना मारण्यासाठी काठी घेऊन धाव घेतली. आजीला पाहून गोळीबार करणारे हादरले. यानंतर ते लगेच दुचाकीवरून पळून गेले. हरयाणातील भिवानी जिल्ह्यात ही घटना घडली आहे.

येथे परस्पर वैमनस्यातून कुस्तीपटू रवीच्या हत्येचा आरोप असलेल्या हरिकिशनवर बदमाशांनी गोळीबार केला. त्याची प्रकृती गंभीर आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काठी घेऊन बदमाशांमागे धावणाऱ्या आजीचे लोक कौतुक करत आहेत.

सुमारे वर्षभरापूर्वी भिवानी येथील पैलवान रवीचा खून झाला होता. हरिकिशन खून प्रकरणातील आरोपी असून, तो सध्या जामिनावर बाहेर आहे. तो सोमवारी सकाळी घराबाहेर बसला होता. यावेळी दोन दुचाकीवरून चार ते पाच हल्लेखोर बंदुकीसह आले आणि त्यांनी हरिकिशनवर गोळीबार केला. तो पळत पळत घरात शिरला. यावेळी जवळच असलेल्या आजीने धाडस दाखवत बदमाशांना मारण्यासाठी काठी हातात घेतली. आजीला पाहताच बदमाशांनी पळ काढला.

Web Title: Grandma's stick, heavy on the gun, drove the shooters away