५० कोटी रूपयांचं सोन्याची टॉयलेट सीट चोरी, चोर सापडले पण सीट अजूनही गायब...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 14:02 IST2025-02-25T13:55:31+5:302025-02-25T14:02:05+5:30
Gold Toilet Seat Stolen: कोर्टानुसार, ही टॉयलेट सीट चोरी प्रकरणातील ३ लोकांपैकी एकाने ही सीट चोरी केली होती. तर दोघांनी ती विकण्यात मदत केली होती.

५० कोटी रूपयांचं सोन्याची टॉयलेट सीट चोरी, चोर सापडले पण सीट अजूनही गायब...
Gold Toilet Seat Stolen: टॉयलेट सीट तुम्ही पाहिली असेलच, सामान्यपणे इंग्लिश टॉयलेट सीट आणि इंडियन टॉयलेट सीटचा वापर होता. या सामान्यपणे चीनी मातीपासून बनवलेल्या असतात. पण तुम्ही कधी सोन्याची टॉयलेट सीट पाहिली नसेल. अशीच एक सोन्याची टॉयलेट सीट चोरीला गेली. ब्रिटनच्या ब्लेनहेम पॅलेसमधून १४ सप्टेंबर २०१९ मध्ये १८ कॅरेट सोन्यापासून तयार टॉयलेट सीट चोरी झाली होती. आता चोरीबाबत आरोपींविरोधात ऑक्सफोर्ड क्राउन कोर्टात केस सुरू आहे. ब्लेनहेम पॅलेस एक भव्य ब्रिटीश महाल असून इथे विंस्टन चर्चिल यांचा जन्म झाला होता. कोर्टानुसार, ही टॉयलेट सीट चोरी प्रकरणातील ३ लोकांपैकी एकाने ही सीट चोरी केली होती. तर दोघांनी ती विकण्यात मदत केली होती.
टॉयलेट सीटचं नाव 'अमेरिका'
पूर्णपणे सोन्यापासून तयार या टॉयलेट सीटची किंमत ५० कोटी रूपये आहे. पहिल्यांदा न्यूयॉर्कच्या गुगेनहेम म्युझिअमध्ये ही ठेवण्यात आली होती. २०१७ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळादरम्यान ही व्हाइट हाऊसमध्ये ठेवण्यासाठी भाड्यानं देण्यात आली होती. इटालियन कलाकार मॉरिजिओ कॅटेलन यांनी या टॉयलेट सीटचं नाव 'अमेरिका' ठेवलं होतं.
टॉयलेट सीट मिळालीच नाही
चोरी झाल्यापासून आजपर्यंत या टॉयलेटचा काहीच पत्ता लागलेला नाही. असं मानलं जातं की, ही टॉयलेट सीट कापून विकण्यात आली. या सोन्याच्या टॉयलेट सीटचं वजन ९८ किलोग्रॅम इतकं होतं. तर याचा ६ मिलियन डॉलरमध्ये विमा काढण्यात आला होता. त्याशिवाय सोन्याची किंमत त्यावेळी ३.५ मिलियन होती. ब्लेनहेम पॅलेसमध्ये प्रदर्शनीसाठी ठेवण्यात आलेल्या या टॉयलेट सीटचा वापर करण्यासाठी गेस्ट ३ मिनिटांचा वेळ घेत होते.
टॉयलेट सीट झाली चोरी
टॉयलेट सीट चोरी करणारा मुख्य आरोपी जेम्स शीन यानं ५ वर्षानंतर ३ एप्रिल २०२४ ला ऑक्सफोर्ड क्राउन कोर्टात हा गुन्हा कबूल केला होता. शीन आधीच चोरी केलेल्या एका केसमध्ये शिक्षा भोगत आहे. शीनशिवाय ३ आणखी लोकांवर सोन्याची टॉयलेट सीटवर चोरी करण्याचा आरोप लावण्यात आला. पण त्यांनी यात त्यांचा हात असल्याचं नाकारलं होतं.