रस्त्यावरील स्टॉलवर अनोख्या पद्धतीने पराठे बनवते ही तरूणी, ग्राहकांची लागली असते रांग!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 16:35 IST2024-07-19T16:34:12+5:302024-07-19T16:35:24+5:30
एका रस्त्यावर स्टॉल लावून पराठे विकणाऱ्या तरूणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ही तरूणी वेगवेगळ्या पद्धतीचे पराठे बनवते.

रस्त्यावरील स्टॉलवर अनोख्या पद्धतीने पराठे बनवते ही तरूणी, ग्राहकांची लागली असते रांग!
सोशल मीडियावर आजकाल वेगवेगळ्या रस्त्यावरील वेगवेगळ्या फूड स्टॉलचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. दिल्लीची ‘वडा पाव गर्ल’ म्हणजेच चंद्रिका गेरा दीक्षित. तिचे कितीतरी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशातच आणखी एका रस्त्यावर स्टॉल लावून पराठे विकणाऱ्या तरूणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ही तरूणी वेगवेगळ्या पद्धतीचे पराठे बनवते. ज्यामुळे तिच्याकडे ग्राहकांची लाईन लागलेली असते.
इंस्टाग्रामवर पूई रोटी लेडी नावाच्या अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ही तरूणी थायलॅंडची असून ती कधी केळीचा तर कधी अंड्याचा पराठा बनवते. तिचा पराठे बनवण्याचा अंदाजही वेगळा आहे. ज्यामुळे ती खूपच फेमस आहे. दोन बहिणी मिळून हा स्टॉल चालवतात. या व्हिडीओत ही तरूणी अंड्याचा पराठा बनवताना दिसत आहे. तर हा पराठा प्लेटमध्येही फारच सजवून दिला आहे.
या तरूणीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. काही तासांमध्ये तरूणीच्या या व्हिडीओला 4 लाख 75 हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर हजारो लोकांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे. तसेच अनेकांनी यावर भरपूर कमेंट्सही केल्या आहेत.
व्हिडीओवर कमेंट करत एका व्यक्तीने लिहिलं की, "तुम्ही स्वयंपाकी लोकांची राणी बनण्या लायक आहात". तर दुसरी एक व्यक्ती तरूणीच्या सुंदरतेवर भाळला आहे. त्याने लिहिलं की, "आता बोला...जे आम्हाला स्वप्नांमध्ये हवं ते स्टॉलवर मिळत आहे". एका महिलेने कमेंट केली की, "जर एखादा पुरूष जेवण बनवत असला असता तर लोकांनी लिहिलं असतं की, ग्लव्स बनवलं पाहिजे. पण इथे असं कुणी करत नाहीये. कारण ती एक महिला आहे".