लूक बदलण्याचं इतकं वेड, परिवारापासून झाली वेगळी; बघा आता कशी दिसते!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 13:37 IST2023-02-02T13:34:03+5:302023-02-02T13:37:37+5:30

डॉलीचे इन्स्टावर हजारो फॅन्स आहेत. ज्यावर ती तिचे फोटो शेअर करत असते. यात तिचे ओठ फारच मोठे दिसत आहेत. या व्हिडीओत ती म्हणत आहे की, मला मनुष्यापेक्षा जास्त प्लास्टिक बनायचं आहे.

Girl dolly mix changed herself to look more plastic than human watch full video | लूक बदलण्याचं इतकं वेड, परिवारापासून झाली वेगळी; बघा आता कशी दिसते!

लूक बदलण्याचं इतकं वेड, परिवारापासून झाली वेगळी; बघा आता कशी दिसते!

जगभरात वेगळं काही करणाऱ्या लोकांची कमी नाही. सध्या अशीच एक तरूणी चर्चेचा विषय ठरत आहे. 29 वर्षीय डॉली मिक्सचं मत आहे की, तिला मनुष्यापेक्षा जास्त प्लास्टिक बनायचं आहे. डॉलीच्या परिवाराची ब्लड लाइन रॉयल परिवारासोबत जुळली आहे. पण ती म्हणते की, तिला दुसऱ्यांच्या आदेशानुसार वागता येणार नाही. डॉली मिक्स 20 वर्षांची असताना लंडनला आली होती.

एका यूट्यूब चॅनलने तिची मुलाखत घेतली आहे. जी सध्या चर्चेत आहे. डॉलीने खूप आधीच परिवारापासून दूर होऊन आकर्षक बनण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी तिने प्लास्टिक सर्जरीची मदत घेतली. प्लास्टिकवरील तिचं प्रेम बघून परिवारानेही तिला सोडलं. या व्हिडीओत तिच्या चुलत भावाला पाच वर्षानी भेटताना दिसत आहे.

डॉलीचे इन्स्टावर हजारो फॅन्स आहेत. ज्यावर ती तिचे फोटो शेअर करत असते. यात तिचे ओठ फारच मोठे दिसत आहेत. या व्हिडीओत ती म्हणत आहे की, मला मनुष्यापेक्षा जास्त प्लास्टिक बनायचं आहे. मी माझ्या परिवाराला खूप वर्षांपासून पाहिलंच नाहीये. त्यांनी माझ्या प्लास्टिक सर्जरीच्या निर्णयाला समर्थन दिलं नव्हतं. मी लिप फिलर केलं आहे. यासाठी मी 15 हजार पाउंड खर्च केले. जेव्हा लोक माझा अपमान करतात तेव्हा मला आणखी सशक्त झाल्यासारखं वाटतं.

डॉलीने तिच्या बालपणाबाबत सांगितलं की, 'बालपणी मी खूप लाजाळू, शांत आणि कमी बोलणारी होते. मी फार क्रिएटिव होते. मला फॅशन आणि कलेची फार आवड होती. माझे पालक खासकरून माझ्या वडिलांनी मला साथ दिली नाही. त्यांना वाटत होतं की, मी लग्न करून मुलांना जन्म देऊ'.
 

Web Title: Girl dolly mix changed herself to look more plastic than human watch full video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.