(Image Credit : The Independent) (सर्व फोटो प्रातिनिधिक)
सोशल मीडियावर एका घटनेच सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका तरुणीने पैशांसाठी तिच्या होणाऱ्या नवऱ्याला सोडलं आहे. या तरुणीला होणाऱ्या नवऱ्यासोबत ब्रेकअप करण्यासाठी लाखो रुपायांची ऑफर देण्यात आली होती. त्यानंतर तरुणीने तरुणाऐवजी पैशांची निवड केली.
storypick.com ने दिलेल्या वृत्तानुसार, या तरुणीला होणाऱ्या नवऱ्यासोबत ब्रेकअप करण्यासाठी चक्क सात लाख रुपयांची ऑफर मिळाली होती. तिने जराही वेळ न घालवता पैशांसाठी प्रियकराला सोडलं. सोशल मीडियावर काही लोकांनी या तरुणीचं कौतुक केलं आणि योग्य निर्णय घेतल्याचं सांगितलं. तरुणीने स्वत: असं का केलं याचा खुलासा केला आहे.
या संपूर्ण घटनेत सर्वात खास बाब ही आहे की, तरुणीने स्वत: खुलासा केला की, तिने असं का केलं. mirror.co.uk च्या रिपोर्ट्सनुसार, प्रियकरासोबत ब्रेकअप करण्यासाठी या तरुणीला दुसरं कुणी नाही तर चक्क त्या तरुणीच्या आई-वडिलांनीच पैशांची ऑफर दिली होती. या तरुणीने रेडीटवर स्वत: याबाबत लिहिले.
रिपोर्ट्सनुसार, तरुणीला सुरुवातीपासून तरुणाचे आई-वडील पसंत करत नव्हते. त्यामुळे त्यांनी तरुणीला ७ लाख रुपयांची ऑफर दिली. त्यांना वाटत होतं की, ही तरुणी त्यांच्या मुलासाठी चांगली नाही. तरी सुद्धा तरुणीने सुरुवातीला प्रियकराची निवड केली होती. तसेच तरुणाच्या आई-वडिलांनी तिला हेही सांगितलं होतं की, ते याबाबत कुणाला काही सांगणार नाहीत.
तरुणीने रेडिटवर लिहिले की, कॉलेजमध्ये असताना तिची प्रियकराशी भेट झाली होती. पण साखरपुड्यानंतर प्रियकराचं वागणं बदललं होतं. तो अधिक जास्त कंट्रोलिंग झाला होता. सतत तिच्यावर लक्ष ठेवायचा. त्याला माझ्या प्रत्येक हालचालीची माहिती हवी होती.
मद्यसेवन केल्यावर तो फार भांडणही करायचा. त्यामुळे त्याच्या या वागण्याला कंटाळून तरुणीने त्याच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यापासून अंतर ठेवू लागली. अशातच त्याच्या आईने ब्रेकअपसाठी सात लाख रुपयांची ऑफर तिला दिली. अशात तरुणीने या संधीचा फायदा घेण्याचा निर्णय घेतला. पैसे मिळतात तरुणी बॅग पॅक करुन घरातून निघून गेली. इतकेच नाही तर प्रियकराच्या आई-वडिलांचे तिने फोन करुन आभार देखील मानले.