मच्छिमारांच्या हाती लागला दैत्याकार मासा, पाण्याबाहेर काढण्यासाठी मागवली क्रेन, पाहा Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 17:53 IST2022-07-15T17:52:44+5:302022-07-15T17:53:13+5:30
मच्छिमारांच्या एका गटाने चिलीमध्ये 16 फूट लांब मासा पकडला. त्याला बाहेर काढण्यासाठी क्रेन बोलवावी लागली.

मच्छिमारांच्या हाती लागला दैत्याकार मासा, पाण्याबाहेर काढण्यासाठी मागवली क्रेन, पाहा Video
Monster Fish Caught: मच्छिमारांनी अनेकदा मोठ्या आकाराचे मासे पकडल्याच्या बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. अशाच प्रकारची एक घटना चिलीमध्ये घडली आहे. पण, यावेळेस हा मासा इतका मोठा होता की, त्याला बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली. या माशाला बाहेर काढण्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मच्छिमारांच्या एका गटाने चिलीमध्ये एक विचित्र दिसणारा 16 फूट लांब मासा पकडला. तो इतका मोठा होता की, त्याला बाहेर काढण्यासाठी क्रेन बोलवावी लागली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मच्छीमार क्रेनला लटकवलेला लांब मासा दाखवत आहेत. डेली स्टारच्या मते, ओरफिश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या माशाची लांबी 5 मीटर (16 फूट) पेक्षा जास्त आहे.
हा व्हिडिओ अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला गेला आहे, परंतु तो पहिल्यांदा TikTok वर पोस्ट करण्यात आला होता. टिकटॉकवर याला जवळपास 10 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. त्सुनामी आणि भूकंपांसाठी हा मासा वाईट शगुन मानला जातो. यावर एका युझरने लिहिले, "हा एक भयानक आश्चर्यकारक मासा आहे," तर दुसर्याने म्हटले, "ओअरफिश खोलवर राहतात. असे म्हटले जाते की जेव्हा ते पृष्ठभागावर येऊ लागतात, तेव्हा टेक्टोनिक प्लेट्समध्ये हालचाल सुरू असते."
ओअरफिश हा समुद्राच्या तळाशी राहणारा मासा आहे. हा मासा पृष्ठभागावर आढळत नाही. मेल्यावरच या माशाचे शरीर पाण्यावर तरंगू लागते. असे म्हणतात की, समुद्राच्या तळाशी भूकंप आला किंवा टेक्टोनिक प्लेट्समध्ये हालचाल सुरू झाली, तेव्हाच हा मासा पृष्ठभागावर येतो. हा मासा पृष्ठभागावर आढळल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.