सुपरहिरो सिनेमातील वेगवेगळे पात्र जसे की, कॅप्टन अमेरिका आणि आयर्न मॅन नेहमीच चाहत्यांसाठी प्रेरणादायी ठरतात. ही पात्रे चाहत्यांना नेहमीच हार न मानने, फोकस राहणे अशा गोष्टी नकळत शिकवून जातात. अनेक सिनेमांमधून अनेक चांगल्या गोष्टी घेता येतात आणि काही लोक घेतातही. अनेकजण त्यांच्या आवडत्या भूमिकेच्या प्रेमात पडतात. ते त्यांच्यासारखे दिसण्याचाही प्रयत्न करतात. मात्र, हे एका लिमिटपर्यंत योग्य वाटतं. याचा अतिरेकही काही लोक करतात. 

(Image Credit :  Instagram/Henry Damon)

आता हेच बघा ना! हेन्री डेमन नावाचा ४१ वर्षीय व्यक्ती. हा व्यक्ती Venezuelan comic book चा मोठा फॅन आहे. इतका की, त्याने कॅप्टन अमेरिका सिनेमातील Red Skull या व्हिलनप्रमाणे लूक करण्याचा निर्णय घेतला.

२०११ साली रिलीज झालेल्या सिनेमानंतर डेमनने व्हिलनसारखा लूक करण्याचा निर्णय घेतला आणि त्याने २०१२ मध्ये डोळ्यांवर टॅटू काढला. डोळे त्याने काळे केलेत. त्यानंतर त्याने चेहऱ्यातही पूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला. 

त्यानंतर डेमनने एकापाठी एक सर्जरी करू लागला. त्यात त्याने सर्जरीच्या माध्यमातून कपाळाचा आकार बदलला. त्यानंतर त्याने चक्क त्याचं नाकही कापून घेतलं. आता तो रेड स्कलसारखा दिसतो आहे. तो पुढे आणखीही काही सर्जरी करणार आहे. 


Web Title: To get Red Skull look man chop his nose
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.