डीजे न लावता करा लग्न, २१ हजार रुपये मिळणार... कुणी दिली ऑफर? जाणून घ्या, संपूर्ण प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 12:50 IST2025-01-10T12:48:13+5:302025-01-10T12:50:24+5:30
लग्नातला अनावश्यक खर्च बरेचदा सगळ्यांनाच परवडतो असे नाही

डीजे न लावता करा लग्न, २१ हजार रुपये मिळणार... कुणी दिली ऑफर? जाणून घ्या, संपूर्ण प्रकरण
भारतीय लग्न म्हटले की मग ते कोणत्याही प्रदेशातले असो, त्यात मोठ्या प्रमाणात खर्च हा आलाच. आता तर लग्न एक इव्हेंट झाले आहे. त्यात कितीतरी गोष्टींवर वारेमाप खर्च केला जातो. या खर्चाला चाप लावण्याचे काम सध्या पंजाबमधील भटिंडातील एका सरपंचांनी केले आहे.
लग्नातला अनावश्यक खर्च बरेचदा सगळ्यांनाच परवडतो असे नाही. म्हणून सरपंच अमरजीत कौर यांनी डीजे आणि दारू शिवाय लग्न लावणाऱ्यांना २१ हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. यातून वधू-वरांच्या पालकांचा खर्चही वाचणार आहे आणि वरती पैसेही मिळणार आहेत. नेटकऱ्यांनी सरपंचांच्या या भूमिकेचे कौतुक केले आहे. यातून समाज प्रबोधन तर होईलच शिवाय ध्वनी प्रदूषणही होणार नाही असे नेटकरी म्हणाले.