सुरूवातीच्या काळात लग्नाच्यानंतर  किंवा लग्नाच्या  दिवशी फोटो काढले जायचे. पण सध्याच्या जमान्यात फोटो काढणं हा लोकांच्या जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे. तसंच आपल्या होणाऱ्या पार्टनरसोबत लग्नाआधी फोटो काढण्याचा क्रेझ प्रचंड वाढला आहे.

 प्री- वेडिंग शूट करण्यासाठी खूप कपल्स उत्सुक असतात. कारणं सोशल मिडीयावर आपल्या पार्टनरसोबतचे आकर्षक फोटोज् पोस्ट करायचे असतात. काहीजण आवड म्हणून तर काहीजण लोकांना इम्प्रेस करण्यासाठी प्री-वेडिंग फोटोशूट करतात. 

मात्र केरळचे रहीवासी असणारे ३२ वर्षीय निवेद अ‍ॅन्थॉनी चुल्लीकल आणि २७ वर्षीय अब्दुल रहीम हे दोघं समलिंगी कपल्स लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. या समलिंगी कपल्सनी नुकतच प्री-वेडींग फोटोशूट केलय. आणि त्यांचे फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत.  #LoveIsLove। असा संदेश त्यांनी  प्री वेडिंग शूटच्या फोटोसोबत पोस्ट केला आहे. 

निवेद आणि अब्दुल्ला यांनी आपलं प्री वेडिंग शूट करत असताना पाळीव प्राण्यांसोबत सुध्दा आपले फोटो काढले आहेत. एका वृत्तपत्राला माहीती देत असताना  निवेद यांनी असे सांगितले की, गे कपल्सचं  फोटो शूट सुध्दा नॉर्मल कपल्स प्रमाणेच रोमॉन्टीक आणि सुंदर असतं हे आम्ही सगळ्यांना दाखवून दिले आहे. कोणत्याही प्रकारचे अश्लील प्रकार या फोटोशूटमध्ये दिसून येत नाही. 

निवेदने सांगितले की आम्हाला इतर कपल्सप्रमाणे लग्न करायचं आहे. त्यांमुळे आम्ही सगळ्या प्रेमी कपल्सप्रमाणे प्री- वेडिंग शूट केलं आहे. यांच्या लग्नात इतर लोकांसारखेच मेहेंदी लावण्याचा कार्यक्रम, हळद तसेच बॅण्डबाजा असणार आहे. 

निवेद आणि अब्दुला या दोघांनाही आपलं लग्न अविस्मरणीय करायचं आहे. त्यामुळे लग्नाचा समारंभ आयुष्यभर आठवणीत राहण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. 

या दोघांची ओळख पाच वर्षांपूर्वी एका लग्नात झाली. सुरूवातीच्या काळात या कपल्सनी परदेशात लग्न करण्याचा विचार केलेला. पण त्यानंतर विदेशात लग्न करायचा प्लान रद्द करून त्यांना स्वदेशात लग्न करण्याचा निर्णय घेतला. निवेद असं सांगतो की सगळ्या  जगासमोर त्यांचा प्रेमाला उघडपणे मान्य करणं अवघड होतं. पण आपल्या समलींगी असलेल्या प्रेमाची कबूली संपूर्ण जगासमोर दिल्यानंतर समाधानाची आणि आनंदाची भावना त्यांच्या मनात आहे.

Web Title: Gay couple pre wedding romantic photoshoot in kerala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.