देशातील एकमेव असं मंदिर जिथे आहे सोंड नसलेल्या गणेशजींची मूर्ती, पाहा कुठे आहे हे मंदिर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 12:59 IST2025-08-26T12:54:06+5:302025-08-26T12:59:19+5:30
Ganesh Chaturthi 2025 : देशभरात गणेशाचे अनेक मंदिरं आहेत, पण काही मंदिरं आपल्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरांमुळे विशेष ओळखली जातात.

देशातील एकमेव असं मंदिर जिथे आहे सोंड नसलेल्या गणेशजींची मूर्ती, पाहा कुठे आहे हे मंदिर
Ganesh Chaturthi 2025 : भारतात गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2025) हा उत्सव मोठ्या जल्लोषात आणि श्रद्धेने साजरा केला जातो. दहा दिवस घराघरात आणि मंडपांमध्ये बाप्पाची मूर्ती प्रस्थापित केली जाते, भजन-कीर्तन होतात आणि शेवटी विसर्जन सोहळ्याने बाप्पाला निरोप दिला जातो.
भगवान गणेश यांना विघ्नहर्ता मानलं जातं. म्हणूनच प्रत्येक शुभकार्यापूर्वी त्यांची पूजा करणे ही आपली परंपरा आहे. देशभरात गणेशाचे अनेक मंदिरं आहेत, पण काही मंदिरं आपल्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरांमुळे विशेष ओळखली जातात. त्यापैकीच एक म्हणजे राजस्थानची राजधानी जयपूर येथे असलेले गढ गणेश मंदिर.
बाळ स्वरूपातील गणेशाची पूजा
गढ गणेश मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे भगवान गणेशाची मूर्ती बाळस्वरूपात (सोंड नसलेले गणेश) प्रस्थापित केलेली आहे. भक्त मानतात की येथे गणपती बाप्पा "पुरुषकृति" स्वरूपात विराजमान आहेत. हा अद्वितीय स्वरूप भक्तांसाठी आकर्षण आणि श्रद्धेचे विशेष कारण आहे.
३०० वर्षांपूर्वीचे मंदिर
गढ गणेश मंदिराची स्थापना महाराजा सवाई जयसिंह दुसरे यांनी अठराव्या शतकात केली. असे मानले जाते की जयपूर वसविण्यापूर्वी त्यांनी अश्वमेध यज्ञ केला, त्याचवेळी या मंदिराची पायाभरणी करण्यात आली. महाराजांनी मूर्ती अशी बसवली की सिटी पॅलेसच्या चंद्र महालातून दुर्बिणीनेही ती दिसावी. यावरून त्यांच्या भक्तीबरोबरच स्थापत्यकलेची दृष्टीही लक्षात येते.
चिठ्ठी पाठवून होते नवस होतो पूर्ण
गढ़ गणेश मंदिराची अजून एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा म्हणजे भक्त आपली इच्छा चिठ्ठी लिहून पाठवतात. लग्न, मुलाचा जन्म, नवी नोकरी किंवा कोणतेही शुभकार्य असो सगळ्यात पहिले निमंत्रण गणेशजींनाच पाठवले जाते. मंदिराच्या पत्त्यावर दररोज शेकडो पत्रे येतात आणि ती गणेशजींच्या चरणी अर्पण केली जातात. ही परंपरा शतकानुशतके चालत आली आहे.
३६५ पायऱ्या आणि सुंदर दृश्य
मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी ३६५ पायऱ्या चढाव्या लागतात, ज्या वर्षातील ३६५ दिवसांचे प्रतीक मानल्या जातात. ही चढाई थोडी कष्टदायक असली तरी मंदिरात पोहोचल्यावर मिळणारा शांत अनुभव थकवा घालवून टाकतो.