३३ कोटी जिंकल्यावर झाला इतका आनंद, उड्या मारता मारता आला हार्ट अटॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2024 10:45 IST2024-06-28T10:45:10+5:302024-06-28T10:45:57+5:30

सिंगापूरच्या मरीना बे सॅंड्स कसीनोमध्ये ही व्यक्ती जुगार खेळण्यासाठी गेली होती. इथे तो ३३.७६ कोटी रूपये जिंकला. यावर त्याचा विश्वास बसला नाही.

Gambler suffers heart attack after winning 33 crore in Singapore | ३३ कोटी जिंकल्यावर झाला इतका आनंद, उड्या मारता मारता आला हार्ट अटॅक

३३ कोटी जिंकल्यावर झाला इतका आनंद, उड्या मारता मारता आला हार्ट अटॅक

जेव्हा एखादी मोठी दु:खद घटना किंवा एखादी खूप आनंदाची घटना घडते तेव्हा व्यक्तीला धक्का लागून हार्ट स्ट्रोक येतो. असंच काहीसं एका व्यक्तीसोबत झालं. त्याला इतका आनंद झाला की, थेट हार्ट अटॅक आला. सिंगापूरच्या मरीना बे सॅंड्स कसीनोमध्ये ही व्यक्ती जुगार खेळण्यासाठी गेली होती. इथे तो ३३.७६ कोटी रूपये जिंकला. यावर त्याचा विश्वास बसला नाही. तो आनंदाने उड्या मारूला लागला होता, अशातच त्याला हार्ट अटॅक आला.

ही व्यक्ती उड्या मारता मारता अचानक खाली पडली. तेव्हा कसीनोमधील स्टाफही गोंधळून गेला होता. त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यासाठी धावपळ झाली. याचा व्हिडीओ समोर आला आहे.

हा व्हिडीओ @OliLondonTV ने शेअर केला आहे. या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून तो आता बरा होत आहे. द सनच्या रिपोर्टनुसार, कसीनोमध्ये नेहमीच येणाऱ्या या व्यक्तीला वाटलं की, या पैशातून त्याचं जीवन बदलणार आहे. त्यामुळे हा आनंद तो सहन करून शकला नाही आणि खाली पडला. 

दरम्यान, याआधी एका ६१ वर्षीय महिलेने मार्च महिन्यात लॉटरी तिकीट खरेदी केली होती. यात तिला १ मिलियन डॉलरचा लॉटरी जॅकपॉट लागला होता. ही लॉटरी जिंकल्यावर महिलेचा पती मरण पावला होता. महिलेचा ३१ वर्षीय पतीला ब्रेन ट्यूमर झाला होता. 

Web Title: Gambler suffers heart attack after winning 33 crore in Singapore